अजितदादांची नक्कल करत राज ठाकरे म्हणाले , “पळून कोणाबरोबर गेली..? लग्न कोणा बरोबर केलं…?”
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- कोरोना ओसरल्यानंतर तब्बल दोन वर्षानंतर मुंबईच्या शिवाजी पार्कवर आज मनसेचा (MNS Gudi Padawa Melawa) गुढीपाडवा मेळावा होत आहे. या मेळाव्याला राज्यभरातून हजारो मनसे कार्यकर्त्यांनी हजेरी लावली.
या मेळाव्यात बोलताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी महाविकास आघडी सरकरवर टीकेची झोड उठवली आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नक्कल करत त्यांच्या पहाटेच्या त्या शपथविधीवरून टीका केली आहे.
त्यानी २०१९ मध्ये विधानसभा निवडणूकीनंतर राज्यात तयार झालेल्या राजकीय परिस्थितीवरुन टिका केली आहे. ते म्हणाले की, निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्षे ठरली होती, महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले नाहीत, इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत, मोदी – शहा हे दोन्ही बोलले मुख्यमंत्री फडणवीस होतील तेव्हा बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मग काढलं. अडीच वर्षाचे काय झाले?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
इतकेच नाही तर त्यांनी पुढे “मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री.” असे म्हणत अजित पवार यांची नक्कल करत त्यांच्यावर देखील टीका केली. ते पुढे म्हणाले की “एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना,” असा टोला त्यांनी यावेळी लगावला.
राज ठाकरे म्हणाले, “तीन नंबरचा पक्ष एक आणि दोन नंबरला फिरवतोय. महाराष्ट्राच्या जनतेशी तुम्ही काय बोलता. आधी शिव्या देतात आणि नंतर एकमेकांच्या मांडीवर बसतात. कारण सांगतात अडीच वर्षांचं तुमचं आतलं झेंगाट, आमच्याशी काय संबंध. ज्या मतदारांनी मतदान केलं ते युती म्हणून केलं. शरद पवार आणि काँग्रेससोबत जाण्यासाठी केलं नव्हतं. मतदारांशी गद्दारी करणाऱ्यांना कोणतं शासन देणार” असा सवाल देखील त्यांनी विचारला.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…