दिल्लीत हक्कभंग समितीसमोर हजर होणार राज्यातील तीन आयपीएस अधिकारी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी दाखल केलेल्या हक्कभंगाच्या नोटीसची दखल घेऊन लोकसभेच्या हक्कभंग समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यावरून झालेल्या वादानंतर खासदार नवनीत राणा यांना संसदीय कर्तव्ये पार पाडण्यात पोलीस अधिकाऱ्यांनी अडथळे आणल्याचे या नोटीसमध्ये म्हटले आहे. लोकसभेच्या हक्कभंग समितीचे अध्यक्ष सुनील कुमार सिंग यांच्या १५ सदस्यीय समितीने राज्यातील तीन आयपीएस अधिकाऱ्यांना हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. यात मुंबईचे पोलीस आयुक्त, अमरावतीचे पोलीस आयुक्त व अमरावतीच्या पोलीस उपायुक्तांचा समावेश आहे. या तिन्ही अधिकाऱ्यांना येत्या ६ एप्रिलला संसदेतील हक्कभंग समितीच्या कक्षात तोंडी साक्षी पुराव्यासाठी हजर राहावे लागणार आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….