येत्या दहा महिन्यात गोव्यात काँग्रेसचं सरकार येणार :- आमदार मायकल लोबो….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पणजी :- नुकत्याच झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झालाय.
गोवा विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागलाय. गोव्यात मोठा विजय मिळवत भाजपनं पुन्हा एकदा सत्ता स्थापन केलीय. प्रमोद सावंत यांनी नुकतीच मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतलीय. अशावेळी काँग्रेस आमदार आणि विरोधी पक्षनेते मायकल लोबो यांनी मोठा दावा केलाय.
गोव्याच्या राजकारणात काहीही असंभव नाही. गोव्यातील वास्तव पाहता गोव्यात अचानक बदल होऊ शकतो. आम्ही येणाऱ्या काही महिन्यात सरकार बनवू आणि त्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न करु. एक-दीड वर्षात आम्ही सरकार बनवण्यात सक्षम होवू, असा दावाही लोबो यांनी केलाय.
भाजपकडं 25 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळं त्यांचं सरकार पडण्याची शक्यता नाही. अशावेळी संख्याबळ कसं गोळा कराल? त्यावर लोबो म्हणाले, पुढील वर्ष खूप महत्वपूर्ण असेल. आमचा पक्ष लवकरच गती पकडेल आणि सरकार बनवण्यात यशस्वी होईल, असा दावा त्यांनी केलाय. सध्या आमच्याकडं 15 आमदारांचं संख्याबळ आहे. तीन अपक्ष आणि दोन जागा महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षानं जिंकल्या आहेत. त्यामुळं काहीही होऊ शकतं, असंही लोबोंनी स्पष्ट केलं.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…