पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हत्येची बातमी समोर येताच एकच खळबळ उडाली आहे. गुप्तचर सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनपुसार, नॅशनल इंव्हेस्टिगेशन एजन्सीला यासंदर्भात काही ई-मेल मिळाले आहे.
एवढंच नाही तर रचलेल्या कटाचा पर्दाफास होऊ नये यासाठी आपण आत्महत्या करत असल्याचा दावाही या मेलमधून करण्यात आला आहे.
दरम्यान, पंतप्रधानांची (Prime Minister Narendra Modi) हत्या करण्यासाठी 20 स्लीपर सेल तयार आहेत. विशेष म्हणजे त्यांच्याकडे 20 किलो आरडीएक्स आहेत. गुप्तचर सूत्रांच्या हवाल्याने, स्लीपर सेलकडून 20 किलो आरडीएक्सच्या साहाय्याने पंतप्रधानांना मारण्याचा कट रचला जात होता. पंतप्रधानांच्या हत्येच्या कटासंदर्भात ई-मेलचा स्त्रोत काय? याची माहिती संरक्षण संस्था मिळवत आहेत.
शिवाय, ईमेलनुसार, पंतप्रधानांच्या हल्ल्याची योजना तयार करण्यात आली आहे. ज्या अज्ञात व्यक्तीने हा मेल लिहिला आहे त्याचे अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याचेही समोर आले आहे. राष्ट्रीय तपास संस्थेने हा धमकीचा मेल इतर गुप्तचर संस्थांना पाठवला आहे. त्याचबरोबर ज्या ईमेल आयडीवरुन हा मेल आला, त्याची बारकाईने तपास यंत्रणांकडून तपासणी करण्यात येत आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…