AICTE चा मोठा निर्णय ; आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षणासाठी आता गणित , भौतिकशास्त्र अनिवार्य नाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- आर्किटेक्चरच्या पदवी शिक्षण प्रवेशासाठी आता गणित, भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र या विषयांची आवश्यकता नसल्याचे अखिल भारतीय तंत्रशिक्षण परिषदेने (AICTE) म्हटले आहे.
AICTE ने मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या हँडबुकमध्ये याबाबतची सूचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. त्याशिवाय, फॅशन टेक्नोलॉजी आणि पॅकेजिंग टेक्नोलॉजी या विषयांसाठी प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना 12 वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित हे विषय अनिवार्य नाहीत.
आर्किटेक्चर पदवी शिक्षणाबाबत AICTE ने घेतलेल्या निर्णयामुळे मोठी चर्चा झडण्याची शक्यता आहे. मागील वर्षी तंत्रशिक्षण प्राधिकरणाने 12वीमध्ये भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र किंवा गणित (PCM) यांचा अभ्यास न केलेले विद्यार्थी अभियांत्रिकीसाठी प्रवेश घेऊ शकतात, असा निर्णय जाहीर केला होता.
AICTE च्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, हा निर्णय घेण्याआधी आम्ही एक तज्ज्ञ समिती स्थापन केली होती. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांना ऐच्छिक करण्याबाबत या समितीने शिफारस केली. PCM या विषयांशिवाय, कॉम्प्युटर सायन्स, माहिती तंत्रज्ञान, बायोलॉजी, बायोटेक्नोलॉजी, अॅग्रीकल्चर, इंजिनियरिंग ग्राफिक्स, बिझनेस स्टडीज आदी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.
कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांना राखीव जागा
आगामी शैक्षणिक वर्षापासून पॉलिटेक्निक शैक्षणिक संस्थांमध्ये ‘PM CARES’ योजनेंतर्गत कोविडमुळे अनाथ झालेल्या विद्यार्थ्यांसाठी दोन जागा राखीव ठेवण्याचा निर्णय AICTE ने जाहीर केला आहे. ज्या विद्यार्थ्यांना पीएम केअर्स प्रमाणपत्र मिळाले आहे, अशा विद्यार्थ्यांना या supernumerary कोट्यातून प्रवेश घेता येणार आहे.
या योजनेनुसार, कोरोना महासाथीच्या आजारात 18 वर्षाखालील विद्यार्थ्यांचे पालक, दत्तक पालकांचे 3 मार्च 2020 नंतर निधन झाले असेल अशा विद्यार्थ्यांना या कोट्यातून प्रवेश मिळू शकेल.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…