देशातील बैंक घोटाळ्यांच्या यादीत महाराष्ट्र अव्वल स्थानी ; RBI ची धक्कादायक माहिती….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- देशातील आर्थिक घोटाळ्यांवर अंकुश लावणे आजतागायत कोणत्याच सरकारला जमलं नाहीये. भ्रष्टाचार विरोधातील आंदोलनानंतर ‘ना खाऊंगा, ना खाने दुंगा’ अशी भूमिका घेऊन सत्तेत आलेल्या मोदी सरकारलाही हे घोटाळे बंद करता आलेले नाहीयेत.
देशात अद्यापही वेगवेगळ्या राज्यांमध्ये असे आर्थिक घोटाळे होतच आहेत. महाराष्ट्र राज्यातील अशा घोटाळ्यांची संख्याही काही कमी नाहीये. आता यासंदर्भातच रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने एक धक्कादायक आकडेवारी मांडली आहे. ही आकडेवारी पाहता महाराष्ट्र राज्याने अधिक सतर्क होण्याची गरज आहे. कारण, देशातील बँक घोटाळ्यांच्या यादीमध्ये महाराष्ट्र अव्वल स्थानी आहे.
देशातील एकूण घोटाळ्यांपैकी महाराष्ट्र अव्वल स्थानी असल्याचं आकडेवारी सांगते. एकूण घोटाळ्याच्या रकमेपैकी 50 टक्के रकमेचे घोटाळे एकट्या महाराष्ट्रात होत आहेत. गेल्या सात वर्षांत राज्यात दोन लाख कोटींचे घोटाळे झालेले आहेत. हे प्रमाण देशाच्या तुलनेत 83 टक्के इतकं आहे. या यादीमध्ये महाराष्ट्राच्या नंतर दिल्लीचा क्रमांक लागतो. तर तिसऱ्या स्थानी तेलंगणा हे राज्य आहे.
काय सांगतो RBI चा अहवाल
या घोटाळ्यांमुळं भारताचं दररोज १०० कोटींचं नुकासान होतं आहे, असं आरबीआयनं म्हटलं आहे. आरबीआयकडील डेटाच्या माहितीनुसार, या बँक घोटाळ्यांमधील एकूण रक्कमेमध्ये दर वर्षाला घट होत असली तरी भारताच्या तिजोरीचं दररोज १०० कोटी रुपयांचं नुकसान होतं आहे. देशाची आर्थिक राजधानी असलेला महाराष्ट्र या यादीत अव्वल स्थानावर आहे. जिथं घोटाळ्यातील ५० टक्के पैशाचा समावेश आहे. त्यानंतर दिल्ली, तेलंगणा, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा समावेश आहे. या पाच राज्यांमध्ये मिळून सुमारे २ लाख कोटी रुपयांहून अधिक रक्कमेचे बँक घोटाळे झाले आहेत. एकूणच ८३ टक्के पैसा हा या आर्थिक घोटाळ्यांमध्ये आहे. या सर्व राज्यांमध्ये मिळून १ एप्रिल २०१५ ते ३१ डिसेंबर २०२१ या काळात २.५ लाख कोटी रुपयांचे बँकिंग घोटाळे समोर आले आहेत. पण, अर्थ मंत्रालयानं असंही म्हटलं आहे की, बँकिंग घोटाळ्यांसंदर्भात त्वरित अहवाल आणि प्रतिबंधासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे दरवर्षी फसवणुकीच्या घटनांमध्ये घट झाली आहे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…