अमिष शेलार मुख्यमंत्र्यांबद्दल बोलताना तोंड सांभाळुन बोला ; अन्यथा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- महाविकास आघाडी सरकारमध्ये (Mahavikas Aghadi) गेल्या काही दिवसांपासून अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. आघाडी सरकामधील अंतर्गत वादामुळे अनेक मंत्री नाराज असल्याचं समोर येत आहे.
अशातच विरोधक आघाडी सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत.
भाजप नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटलं आहे. हिंदू सणांचा विषय आला की ठाकरे सरकारच्या हाताला लकवा का मारतो? असा सवाल आशिष शेलार यांनी विचारला आहे. यावर आता शिवसेना नेत्या मनिषा कायंदे (Manisha Kayande) यांनी संताप व्यक्त केला आहे.
आशिष शेलार, मुख्यमंत्र्यांबद्दल तोंड सांभाळून बोला. अन्यथा शिवसैनिक (shivsainik) तुम्हाला पळता भूई सोडणार नाही, असा इशारा मनिषा कायंदे यांनी दिला आहे.
दरम्यान, आतापर्यंत कोरोना परिस्थिती पाहूनच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदू सणांना परवानगी दिली आहे. आरोग्याला प्राधान्य दिल्यानेच महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणात राहिला आहे, असंही कायंदे म्हणाल्या.

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी तडजोड नको..! ; माजी मुख्यमंत्र्यांनी शिक्षण घेतलेले सावित्रीबाई फुले शाळा क्र. २ मध्ये सुरक्षा जाळी व मच्छर फवारणीची तातडीने व्यवस्था करा ; यादव मारोती हाटे यांच्यासह पालकांचे प्रशासनाला निवेदन…
ईद मिलादुन्नबी भव्य मिरवणुकीतील मान्यवरांचा लोहार लाईन मध्ये नगरसेवक फिरोज खान यांचासह समाज बांधवांचे सत्कार करण्यात आले…
पुसद शहरातील अवैद्य धंदे त्वरित बंद करा ; शिवसेनेतर्फे आंदोलनालाचा इशारा…
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार..? पार्थ पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचे मोठे पाऊल ; २९ ऑगस्टला मुंबईत निर्णय…
महायुतीचा जिल्ह्यातील निधीवाटपाचा फॉर्म्युला ठरला, पालकमंत्र्यांच्या हाती ‘इतका’ निधी, 15 दिवसात महामंडळाचे वाटप…
अमरावती डफरिन रुग्णालय अग्निकांड: ७ सदस्यीय उच्चस्तरीय समिती करणार चौकशी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत.