बर्निंग बस नंतर आता ट्रॅव्हलर टेम्पो लागली आग……
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- दोन दिवसापूर्वी बर्निंग बसचा थरार संपतो न संपतो तोच आज ट्रॅव्हलर टेम्पोला आग लागल्याने प्रवाशांची चांगलीच तारांबळ उडाली. जीवित हानी झाली नसली तरी मात्र ट्रॅव्हलर टेम्पो चे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
पुसद उमरखेड जाणारी बसला शिळोना घाटामध्ये चालत्या बसला आग लागली आणि या बर्निंग बसचा फरक ची बातमी शेळी होण्याअगोदरच पुसद खंडाळा रोडवर खंडाळा घाटात अचानक ऑल इंडिया परमिट असलेल्या ट्रॅव्हलर टेम्पो ला इंजन मध्ये आग लागल्याने एकच खळबळ उडाली. प्रवाशांनी भरून असलेला हा टेम्पो अचानक लागलेल्या आगीमुळे भयग्रस्त झाला होता परंतु चालकाने आपले वाहन थांबून प्रवाशांना बाहेर काढले. मदतीसाठी धावा धाव चालू असताना रोडच्या कामावरील पाण्याचे टँकर वेळेवर घटनास्थळी पोहोचले. त्या ठिकाणी नागरिकांनी सुद्धा आग विझवण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले आणि आग विझवली यामध्ये गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
घटना स्थळचा व्हिडिओ….
चालत्या वाहनाला आग लागण्याचे प्रमाण वाढले असल्याने प्रवासी तथा चालक वाहक व महामंडळाने आवश्यक ते आगीवर नियंत्रण आणणारे साधने उपलब्ध व तत्पर ठेवावे तरच पुढील अनर्थ टाळण्यास मदत होईल. मुळात गाडी चालक मालकांनी आग लागण्यापूर्वी प्रतिबंधात्मक उपाय योजना कराव्यात गाडीमध्ये आग लागण्याच्या कारणाचे बाबत सुधारणा कराव्या गाडीची काळजी घ्यावी तरच लोकांचे जीव वाचण्यात मदत होईल.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…