गोव्यात वर्षात ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत ; राज्य मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पणजी :- गोव्यात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (Pramod Sawant) यांचा मंत्रीमंडळाबरोबर काल शपथविधी झाला. त्यानंतर झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत भाजप सरकारने जनतेला दिलेले आश्वासन पूर्ण केले आहे.
त्यानुसार गोव्यात वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहेत.
निवडणूक प्रचारादरम्यान भाजपने सत्तेत आल्यास गोवेकरांना वर्षाला ३ एलपीजी गॅस सिलेंडर मोफत मिळतील असे आश्वासन जाहिरनाम्यात दिले होते. वर्षासाठी महिलांना ३ गॅस सिलिंडर मोफत, ज्येष्ठ नागरिकांना दयानंद सुरक्षा योजनेखाली मिळणारे मानधन वाढवून ३ हजार रुपये, सहा महिन्यांत कायदेशीर मार्गाने खाणी सुरु करणार, अशी प्रमुख अश्वासने जाहिरनाम्यात दिली गेली होती. त्यामुळे ३ सिलेंडरच्या आश्वासनाची पूर्तता आता होणार आहे. आमच्यासाठी ती केवळ आश्वासने नसून ते जनतेला दिलेले वचन आहे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. तसेच मंत्रिमंडळाने राज्यपालांच्या अभिभाषण मसुद्यालाही मंजुरी दिली आहे.

उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….