राजकारण तापलं ; मुख्यमंत्र्यांवर टीका अन् भाजपचे तीन आमदार झाले निलंबित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- मुख्यमंत्र्यांवरील वादग्रस्त वक्तव्यावरून भाजप आमदार अडचणीत आले आहेत. दिल्लीच्या विधानसभेत आम आदमी पक्ष (आप) विरुद्ध भाजप असा जोरदार संघर्ष आज झाला. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी आज झालेल्या गदारोळात भाजपच्या तीन आमदारांनी विधानसभा अध्यक्षांनी निलंबित केले आहे.
यामुळे आता सभागृहाबाहेर आप विरुद्ध भाजप अशा शाब्दिक फैरी सुरू झाल्या आहेत.
दिल्ली भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदेशकुमार गुप्ता यांनी केजरीवाल यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले आहे. भाजपच्या प्रदेशाध्यक्षांनी मुख्यमंत्र्यांची माफी मागावी, अशी मागणी आपच्या सदस्यांनी आज सभागृहात लावून धरली. या वेळी आपचे सदस्य आक्रमक झाले होते. या प्रकरणी विरोधी पक्षनेत्यांनी माफी मागावी, अशी मागणीही आपने केली. या वेळी भाजपचे आमदार अनिल वाजपेयी, जितेंदर महाजन आणि अजय महावर हे थेट बाकावरच उभे राहिले. अध्यक्षांनी विनंती करूनही ते बाकावरून खाली न उतरल्याने विधानसभा अध्यक्ष रामनिवास गोयल यांनी तिघांनीही निलंबित केले. त्यांचे निलंबन आजच्या दिवसासाठी आहे.
पंजाबच्या विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्षाने (AAP) जोरदार विजय मिळवला आहे. यामुळे राष्ट्रीय पातळीवर भाजपला (BJP) रोखण्यासाठी आपकडे पाहिले जात आहे. आपचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हे आता केंद्र सरकारसह पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) विरोधात आक्रमक झाल्याचे दिसत आहे. नुकतीच केजरीवालांनी विधानसभेतच थेट भाजप आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर देऊन खळबळ उडवून दिली होती.
दिल्लीतील तीन महापालिका एकत्र करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. यावरून आप विरुद्ध भाजप असा वाद सुरू आहे. या वादावर बोलताना केजरीवाल त्यांनी विधानसभेत थेट सभागृहात बसलेल्या आमदारांना आपमध्ये येण्याची ऑफर दिली. यामुळे सभागृहातील भाजप आमदारही अवाक झाले होते. केजरीवाल म्हणाले होते की, भाजप त्यांच्या आमदारांना मेंढराप्रमाणे हाकत आहेत. आधी तीन कृषी कायदे आणले आणि सगळ्यांना सांगितले याला मास्टरस्ट्रोक म्हणा. कायदे मागे घेतल्यानंतर म्हणाले, मोदीजींचा मास्टरस्ट्रोक. काय तुमचे भाजपवाल्यांनी हाल चालवले आहेत. रोज वरून काही तरी काम तुम्हाला दिले जाते. तुम्ही आता देशाचा विचार करा. हिटलरने चमच्यांना रोजगार दिला होता. तुम्हाला भाजपकडून काय मिळाले? तुमच्या मदतीला केजरीवाल येतो मोदी नाही. तुम्ही आता डोळे उघडा. भाजपच्या सगळ्या आमदारांनी आपमध्ये यावे.

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…