आमदार आराधना मिश्रा सांभाळणार काँग्रेस विधिमंडळाची कमान…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या आहेत.
उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत (Uttar Pradesh Assembly Election) प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर खास मतदारसंघातून निवडून आलेल्या आमदार आराधना मिश्रा (Aradhana Mishra) उर्फ मोना या पुन्हा एकदा काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेत्या असणार आहेत.
काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस केसी वेणुगोपाल (K C Venugopal) यांनी आराधना यांना पाठवलेल्या पत्रात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी त्यांची उत्तर प्रदेश काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केल्याची माहिती दिली. आराधना या गेल्या विधानसभेत काँग्रेस विधीमंडळ पक्षाच्या नेत्या राहिल्या आहेत.
2017 मध्ये भारतीय जनता पक्षानं (BJP) पूर्ण बहुमताचं सरकार स्थापन केल्यानंतर, अजय कुमार लल्लू यांना कॉंग्रेस (Congress Party) विधिमंडळ पक्षाचे नेते बनविण्यात आलं होतं. परंतु, नंतर त्यांची प्रदेश कॉंग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती झाल्यानंतर ही जबाबदारी आराधना यांच्याकडं सोपविण्यात आली होती. गेल्या विधानसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशातील 403 जागांपैकी काँग्रेसनं फक्त सात जागा जिंकल्या होत्या. यावेळी अजय कुमार लल्लू यांचा कुशीनगर जिल्ह्यातील तमकुहिराज येथून भाजपच्या डॉ. असीम कुमार यांच्याकडून पराभव झाला. नंतर त्यांनी प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाचाही राजीनामा दिला.
यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला फक्त दोन जागा मिळाल्या, त्यात प्रतापगडच्या रामपूर खास जागेवरून आराधना पुन्हा निवडून आल्या आहेत, तर महाराजगंज जिल्ह्यातील फरेंदा मतदारसंघातून विजयी झालेले वीरेंद्र चौधरी हे काँग्रेसचे दुसरे आमदार आहेत. चौधरी यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकलीय, तर आराधना तिसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आल्या आहेत. आराधना यांचे वडील प्रमोद तिवारी हे देखील दीर्घकाळ काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते होते.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….