अधिवेशनाच्या उताऱ्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक नागपुरात…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नागपूर :- दोन वर्षांपासून विधिमंडळाचे अधिवेशन घेतले नसल्याने वैदर्भीयांमध्ये निर्माण झालेली नाराजी दूर करण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेऊन दिलासा देण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीच्यावतीने केला जात आहे.
मंत्रिमंडळाच्या बैठकीत विदर्भातील प्रश्न, प्रकल्प आणि प्रश्नांवर प्रामुख्याने चर्चा केली जाणार आहे. तसा अजेंडा ठरवला जात असल्याचे समजते. असे झाल्यास अधिवेशन वगळता गेल्या दोन-तीन दशकात पहिल्यांदाच मंत्रिमंडळाची बैठक नागपूरला होईल.
करारानुसार एक अधिवेशन नागपूरला होणे बंधनकारक आहे. काही कारणामुळे आतापर्यंत सहावेळा एकही अधिवेशन नागपुरात झाले नाही. महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे सलग दोन वर्ष अधिवेशन नागपूरला घेण्यात आले नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरला घेण्याची घोषणा केली होती. मात्र शेवटच्या टप्प्यात आघाडी सरकारने निर्णय बदलवला. आता यापुढील पावसाळी अधिवेशन मुंबईतच घेण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे विदर्भातील नेत्यांनी आघाडी सरकारला विदर्भाशी देणेघेणे नाही असे जाहीर आरोप करणे सुरू केले आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रवादी पार्टी असेच आधीपासून संबोधले जाते तर शिवसेनेला विदर्भाशी काही देणेघेणे नसते. यात दोन वर्षांपासून अधिवेशन घेण्यास टाळाटाळ केली जात असल्याने वैदर्भीयांचा रोष निवडणुकीत विरोधात जाण्याची भीती वर्तविली जात आहे. पश्चिम महाराष्ट्रालाच झुकते माप दिले जात असल्याने विदर्भात भाजप चांगलीच मजबूत झाली आहे. पुन्हा एकदा स्वतंत्र विदर्भाची भावना निर्माण होऊ लागली असल्याने मंत्रिमंडळाची बैठक घेऊन ठोस निर्णय विदर्भासाठी घेण्यात येणार असल्याचे समजते.
सचिवालय कक्ष फक्त नामधारी
महाविकास आघाडीच्या सरकार स्थापनेनंतर मंत्रीही फारसे नागपुरात फिरकले नाही. येथील प्रश्नांसाठी होणारी मुंबईवारी कमी करण्यासाठी नागपूरच्या विधानभवनात सचिवालयाचे एक कक्ष सुरू करण्यात आले. सचिवालयाचे कक्ष सुरू झाल्याने राजधानी आणि उपराजधानी मधील दुरावा कमी होणार असून विदर्भाच्या विकासाला प्राधान्य देण्यात देण्यात येईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्घाटनाच्यावेळी म्हणाले होते. कक्ष होऊन वर्षभराचा काळ झाला. परंतु एकही मंत्री येथे आले नाही किंवा बैठक घेतली नाही. त्यामुळे सचिवालय फक्त नाममात्र झाले आहे.

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…