दापोलीत हायहोल्टेज ड्रामा ; किरीट सोमय्या व निलेश राणेना अटक करून जिल्ह्याबाहेर सोडणार….?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दापोली :- राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांचं कथित रिसॉर्ट पाडण्याच्या मागणीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या आणि माजी खासदार निलेश राणे आज दापोलीत आहेत.
त्यांनी दापोली पोलिसांकडे एफआयआर नोंदवण्याची मागणी केली. मात्र, पोलिसांनी एफआयआर नोंदवला नाही आणि रिसॉर्टकडेही जाऊ दिलं नाही. यावेळी सोमय्या, निलेश राणे यांचा पोलिसांसोबत चांगलाच वाद झाल्याचं पाहायला मिळालं. सोमय्यांनी पोलीस ठाण्यासमोरच ठिय्या मांडला. त्यानंतर सोमय्या आणि निलेश राणे आपल्या कार्यकर्त्यांसोबत चालतच परबांच्या कथित रिसॉर्टकडे निघाले होते. पण पोलिसांनी त्यांना अडवलं. याठिकाणी पोलीस आणि निलेश राणे यांच्यात हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. अखेर पोलिसांनी नीलेश राणे आणि सोमय्या यांना अटक केली आहे.
दापोलीत जमावबंदी पोलिसांकडून लागू करण्यात आली होती. या जमावबंदीचं उल्लंघन केल्याप्रकरणी पोलिसांकडून नीलेश राणे आणि किरीट सोमय्या यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांनी दोघांनाही अटक केली असून त्यांना जिल्ह्याबाहेर सोडण्यात येणार आहे. पोलिसांनी आम्हाला अटक केली असून रत्नागिरी जिल्ह्याच्या बाहेर सोडण्यात येणार असल्याची माहिती खुद्द किरीट सोमय्या यांनी प्रसारमाध्यमांना दिली आहे. तसंच आमचा सत्याग्रह यशस्वी झाला असल्याचा दावा देखील सोमय्या यांनी यावेळी केला आहे.

सिंधुरत्न समृद्ध योजना 2.0 सुरू राहणार, संत्रा आयात शुल्क परतावा योजना रद्द…; कॅबिनेटच्या बैठकीत राज्य सरकारचे 14 धडाकेबाज निर्णय..…
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चेनंतरच आनंद परांजपेंचा पक्षप्रवेश; उदय सामंत यांचे स्पष्टीकरण…..
मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर मोर्चा नेणारच – राजू शेट्टी…..
राज्यातील ‘या’ दोन जिल्ह्यांत तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा ; यलो अलर्ट जाहीर…..
निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….