दिल्लीत कॉंग्रेसची महत्वपूर्ण बैठक ; सोनिया गांधी ठरवणार नवा अजेंडा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नवी दिल्ली :- पाच राज्यातील पराभवाच्या नाराजीनंतर दिल्लीत काँग्रेसचे सर्व सचिव, सरचिटणीस आणि प्रभारी यांची काँग्रेस (Congress) अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी बैठक बोलावली आहे.
या बैठकीत नेमके कोणते निर्णय होणार आहेत, निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेस कोणत्या विषयावर चर्चा करणार आहे याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. पाच राज्यांच्या निकाल लागल्यानंतर काँग्रेसने आत्मचिंतन करावे असा सल्ला प्रत्येक स्तरातून देण्यात आला. या पार्श्वभूमीवर या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
दहा मार्चला पाच राज्यांच्या निवडणुकींचा निकाल लागला. त्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत खदखद सुरू आहे. पक्षाच्या नेतृत्वावर आणि कार्यशैलीवर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. गेल्या दोन आठवड्यापासून काँग्रेसमध्ये वेगवेगळ्या बैठका घेतल्या जात आहेत. याच पार्श्वभूमीवर आजची बैठक महत्त्वाची आहे. राज्यातल्या सर्व काँग्रेस प्रभारी, सचिवांना या बैठकीसाठी बोलावण्यात आले आहे. काँग्रेसचे मुख्यालय दिल्ली येथे ही बैठक होत आहे. पाच राज्यांच्या निवडणुकीनंतर पुढची दिशा ठरवण्यासाठी तसेच येत्या गुजरात, हिमाचल प्रदेश या महत्त्वाच्या राज्यांच्या निवडणुका होणार आहेत. या पार्श्वभुमिवर काँग्रेसचा अजेंडा ठरणार आहे. काँग्रेसमधे गेली तीन वर्षापासून अध्यक्ष पदाचा प्रश्न भिजत पडला आहे. या पार्श्वभूमीवरही काँग्रेसमध्ये वेगळी चर्चा होती का हे आजच्या बैठकित स्पष्ट होईल.
चार राज्यात भाजपने आघाडी मारल्यानंतर काँग्रेसने बैठका घेण्यास सुरुवात केली आहे. काॅंग्रसने २०२४ च्या लोकसभा निवडणुकांसाठी प्रादेशिक पक्षांची मोर्चेबांधणी सुरू केली आहे. दहा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची दिल्लीत परिषद बोलण्याची तयारी सुरू आहे. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखरराव, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्या पुढाकाराने परिषद बोलवण्याची तयारी सुरू आहे.

राष्ट्रवादीत मोठा भूकंप..! प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि भुजबळांना डच्चू..? कार्यकारणीच्या नवीन यादीने राजकीय वर्तुळात खळबळ….
ममतांसह इतरांनी नव्याने याचिका करावी, विजयी मतांच्या फरकावरून सर्वोच्च न्यायालयाचा निर्वाळा….
MIM नगरसेवक मतीन पटेल कोंडीत..! निदा खान थांबलेल्या घरासह कार्यालयाला मनपाची ‘नोटीस’
राष्ट्रवादीतून प्रफुल्ल पटेल पदच्युत ; राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या नव्या पत्रातून शिक्कामोर्तब….
विदर्भात उन्हाचं ‘तांडव’ ; तरुण शेतमजुर दगावला ; 350 हून अधिक उष्माघाताचे रुग्ण, प्रशासनाकडून हाय अलर्ट….
महाराष्ट्र सरकारचे कॉस्ट कटींगचे ३ नियम लागू, अधिकाऱ्यांच्या खर्चावर चाप; पंतप्रधान मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद….