विशेष केंद्रीय सहाय योजनेंतर्गत आदिवासी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ दि. 25 मार्च :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडा यांचे मार्फत विशेष केंद्रीय सहाय योजने अंतर्गत सिंचनासाठी बोअर वेल, विहीर, सोलर पंप तसेच एकात्मिक कृषी विकास कार्यक्रम आणि पशुपालन, मत्स्यपालन व दुग्धविकास योजनेचा लाभ घेण्यासाठी वनहक्क कायद्यांतर्गत जमिनीचे पट्टे मिळालेल्या इच्छुक आदिवासी शेतकऱ्यांकडून अर्ज आमंत्रित करण्यात आले आहे.
इच्छुकांनी 28 माचे ते 20 एप्रिल 2022 या कालावधीत कार्यालयात विहित नमुन्यातील अर्ज सादर करावा. अर्जासोबत रहीवासी दाखला, जातीचा दाखला, वनहक्क कायद्याद्वारे वनपट्टा प्राप्त झाल्याचे प्रमाणपत्र, यापुर्वी लाभ न घेतल्याचे प्रमाणपत्र, विहिर, बोअरवेल प्रस्तावित असलेल्या ठिकाणी पाण्याची उपलब्धता असल्याचे भुजल सर्व्हेक्षण यंत्रणेचे प्रमाणपत्र, किमान जमीन, बँक खाते पुस्तीका इत्यादी आवश्यक कागदपत्रे सोबत जोडावी, असे एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प पांढरकवडाचे प्रकल्प अधिकारी विवेक जॉनसन यांनी कळविले आहे.

सरपंच पदाच्या सुधारित आरक्षणाची सोडत ९ सप्टेंबरला…
मागण्या मान्य होईपर्यंत उपचार घेण्यास मनोज जरांगे पाटलांचा नकार; पाणी अन् सलाईनही बंद, म्हणाले ‘जो पर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तो पर्यंत…’
अटी शर्तींसह महात्मा गांधींचे स्मृतीस्थळ असलेल्या राजघाटावरच होणार माजी PM मनमोहन सिंग यांचे स्मारक…
‘डीजे’चे स्तोम लोकसहभागातून कमी करू; गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करा : मुख्यमंत्री फडणवीस…
संजय राऊतांवर तुरुंगात विषप्रयोग झाला? राहुल गांधींमुळे मी….; राऊतांच्या दाव्याने राजकारणात खळबळ, काय घडलं?
NCMC कार्ड सक्तीवरून एसटी प्रवाशांचे हाल; ‘हा गोंधळ तात्काळ थांबवा’, जयंत पाटलांचा सरकारला इशारा…