उद्धव ठाकरे यांच्या अडचणीत पुन्हा वाढ ; आदित्य ठाकरे , रश्मी ठाकरे यांची ही चौकशी होणार….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मागील अनेक दिवसांपासून राज्यातील महाविकास आघाडींच्या नेत्यावर ईडीचे (ED) धाडसत्र सुरू आहे. नुकतंच ईडीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांचे मेव्हुणे श्रीधर पाटणकर (Shridhar Patankar) यांच्या मालमत्तेवर टाच आणली आहे.
ईडीच्या या कारवाईमुळे (Shridhar Patankar ED Raids) राज्यात खळबळ उडाली आहे. ईडीनं ठाण्यातील निलांबरी प्रकल्प, साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लि यांच्या 11 सदनिका ताब्यात घेतल्या आहेत. नंदकिशोर चतुर्वेदी (Nandkishore Chaturvedi) यांच्या हमसफर डीलर कंपनीकडून पाटणकर यांच्या कंपनीला विनातारण तीस कोटींचे कर्ज देण्यात आले. यामध्ये अपारदर्शकता असल्याचा आरोप ईडीकडून करण्यात आला आहे.
‘रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray), आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) आणि श्रीधर पाटणकर यांच्यात आर्थिक व्यवहार झाले आहेत. 2014 मध्ये आदित्य ठाकरे, रश्मी ठाकरे यांनी कोमो स्टॉक्स प्रॉपर्टी एलएलपी नावानं कंपनी स्थापन केली. त्यानंतर कोमो स्टॉक्स ही कंपनी हवाला ऑपरटेर नंदकिशोर चतुर्वेदी यांच्या नावे हस्तांतरित झाली. मग नंदकिशोर चतुर्वेदी यांचे आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे यांच्याशी कोणते संबंध आहेत?’ असा सवाल करत भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी मोठा दावा केला आहे. (Shridhar Patankar ED Raids)
किरीट सोमय्या म्हणाले की, ‘मागील अनेक महिने याप्रकरणी तपास सुरू होता. नंदकिशोर चतुर्वेदी आणि ठाकरे कुटुंबात 10-12 वर्षापासून मनी लॉन्ड्रिंग सुरू आहे. 2010 आणि 2014 मध्ये आदित्य ठाकरेंनी अशीच कंपनी नंदकिशोरला दिली होती. डर्टी डझन नेत्यांपैकी दोन आत मध्ये गेलेत. येत्या काही दिवसांत कारवाईला गती येईल. ठाकरे कुटुंबाकडे आलेला पैसा भ्रष्टाचाराचा आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (BMC Mayor Kishori Pednekar) यांच्यावरही काही दिवसांत गुन्हा दाखल होईल,’ असाही दावा त्यांनी केला.
पुढे बोलताना सोमय्या म्हणाले, ‘शरद पवार (Sharad Pawar) आणि उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला मुर्ख समजलं आहे.
तुम्ही लोकांना लुटून रक्त पिता कोणीतरी बोलायला लागल्यावर त्याला सूडबुद्धी बोलणार का? घोटाळेबाजांच्या विरोधात किरीट सोमय्या जिद्दीने लढत आहे.
सगळे घाबरलेत कारण सर्वांचे घोटाळे बाहेर येणार आहेत.
घोटाळे बंद करा आणि जनतेचा पैसा जनतेच्या तिजोरीत जमा करा नाहीतर ही लढाई अशीच सुरू राहील.’

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….