“आगे आगे देखो होता है क्या” ; नारायण राणेचा उद्धव ठाकरेंना थेट इशारा….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने जोरदार दणका दिलाय.
पाटणकर यांच्या ठाण्यातील 11 सदनिका ईडीने जप्त केल्या आहेत. त्याची आजची किंमत 6 कोटी 45 लाख असल्याची माहिती ईडीने दिलीय. ईडीने पुष्पक ग्रुपच्या (Pushpak Group) कंपन्यांपैकी एक असलेल्या मेसर्स पुष्पक बुलियनशी संबंधित 6 कोटी 45 लाख रुपयांची स्थावर मालमत्ता जप्त करण्यात आलीय. यात साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडच्या ठाण्यातील नीलांबरी प्रकल्पातील 11 सदनिकांचा समावेश आहे, असं ईडीकडून सांगण्यात आलंय. या पार्श्वभूमीवर आता शिवसेना आणि भाजप नेत्यांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरु झालेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी ईडीच्या या कारवाईनंतर थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ‘आगे आगे देखो होता है क्या’ असं म्हणत थेट इशारा दिलाय.
‘आगे आगे देखिए होता है क्या! महाराष्ट्रात भ्रष्टाचाराने कळस गाठलाय. जनतेचे शोषण होत आहे. सूडबुद्धीने कारवाया होत आहेत. यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. सव्वा दोन वर्षांत महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना, एसटी कर्मचाऱ्यांना काय मिळाले? त्यांच्या नशिबी आत्महत्या! आप्तांच्या तिजोऱ्यांमध्ये मात्र कोट्यवधींची भर. ही संपत्ती कुठून आली? कोणाकडून आणली? शिवसैनिकांच्या वाट्याला यातील काहीही नाही. सत्ता फक्त आपण आणि आपल्या नातेवाईकांसाठीच!’ असं ट्वीट करत राणे यांनी मुख्यमंत्र्यांना इशारा देत जोरदार टीकाही केलीय.

नितेश राणेंकडून मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी
‘थेट मुख्यमंत्र्यांच्या नातेवाईकांवर ही कारवाई झाली आहे. आता मुख्यमंत्री कशासाठी थांबलेत, त्यांनी राजीनामा द्यावा. आतापर्यंत आम्ही सगळीकडे त्यांचं नाव ऐकत होतो. ते आता सिद्ध झालं आहे. तो पैसा काही त्यांच्या घरापर्यंत मर्यादित राहिलेला नाही. ते भुयारी गटार थेट मातोश्रीपर्यंत जातं. त्यामुळे आता मातोश्रीने उत्तर द्यायला हवं, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला उत्तर द्यावं. सचिन वाझे आणि हे पैसे कुठे कुठे फिरत आहेत हे आता समोर आलंय. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नैतिक दृष्टीकोनातून राजीनामा द्यावा’, अशी आक्रमक मागणी आमदार नितेश राणे यांनी केलीय.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….