रेल्वे विभागाच्या हलगर्जीपणामुळे शीख भविकांचे नांदेड़ रेल्वे स्थानकावर आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- नांदेडहून नवी दिल्ली मार्गे अमृतसरला जाणाऱ्या सचखंड एक्सप्रेसचा एक आरक्षित डब्बा लावण्यास विसरल्याचा प्रकार मंगळवारी (ता.२२) सकाळी दिसून आला. या प्रकाराने संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे स्थानकावर रेल्वे रोखून धरत जोरदार आंदोलन केले.
सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी नांदेडमध्ये आलेल्या शीख भाविकांनी सचखंड एक्सप्रेस नांदेड-अमृतसर ही रेल्वे ‘एस-नऊ’ हा डब्बा न लावल्याने रोखून धरली. सीआरपी आणि आरपीएफ तसेच रेल्वे प्रशासनाने मध्यस्थी करून तब्बल दीड तासानंतर सचखंड एक्सप्रेस अमृतसरकडे रवाना केली. होळीनिमित्त दिल्ली, अमृतसर, पंजब भागातून सचखंड गुरुद्वाराचे दर्शन घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर शीख भाविक नांदेडला आले होते. हे भाविक सचखंडचे दर्शन घेऊन व हल्लाबोल मिरवणूक संपल्यानंतर मंगळवारी आपल्या गावी निघाले होते.
विशेष म्हणजे या भाविकांकडे चार महिन्यांपासून रेल्वेचे काढलेले कन्फर्म तिकिट होते. पण, मंगळवारी जेव्हा ते नांदेड रेल्वेस्थानकावर आले तेव्हा रेल्वे प्रशासनाने सचखंड एक्सप्रेसला ‘एस-नऊ’ हा आरक्षीत डब्बा लावला नसल्याचे दिसून आले.
या प्रकारामुळे शीख भाविक संतापले. घडलेला प्रकार रेल्वे स्थानकावरील अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिला. पण, अधिकाऱ्यांकडून फारसा सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे भाविकांनी सचखंड एक्सप्रेस रेल्वे रोखून धरली. जोपर्यंत सदरचा डबा लावणार नाही तोपर्यंत रेल्वे सुटू देणार नाही अशी भूमिका भाविकांनी घेतली होती. अखेर रेल्वे प्रशासनाने ‘एस नऊ’ हा डब्बा रेल्वेला जोडून रेल्वे अमृतसरकडे रवाना केली.
परिणामी दररोज साडेनऊ वाजता सुटणारी सचखंड एक्सप्रेस मंगळवारी अकरा वाजेच्या दरम्यान म्हणजे तब्बल दीड तासाने अमृतसरकडे रवाना झाली. यावेळी लोहमार्ग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक सुरेश उनवणे, पोलिस उपनिरीक्षक राजेश यलगुलवार, उत्तम कांबळे, विजया कदम, कांचन राठोड, विनोद कोरडे, संदीप गोपने, राम कातकडे, आरपीएफचे अमित उपाध्ये, रेल्वे प्रबंधक एस. एस. कालीचरण यांनी मध्यस्थी केली.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….