पश्चिम बंगाल मध्ये टीएमसी नेत्यांच्या हत्येनंतर उसळला हिंसाचार ; 10 जणांना जिवंत जाळलं….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रामपूरहाट :- पश्चिम बंगाल मधील बीरभूम जिल्ह्यातील रामपूरहाट येथे टीएमसी नेत्याच्या हत्येनंतर टीएमसी कार्यकर्ते संतप्त झाले आणि परिसरात हिंसाचार पसरला.
कथितपणे संतप्त जमावाने 10-12 घरांचे दरवाजे बंद करून त्यांना आग लावली. या आगीत 10 जण जिवंत जळाल्याची प्राथमिक माहिती आहे. यामुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण झाले आहे. या पार्श्वभूमीवर या परिसरात मोठ्या प्रमाणात अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना सोमवारी रात्री घडली आहे. यामध्ये 10-12 घरे जळाली आहेत. एकूण 10 लोकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. एकाच घरातून 7 लोकांचे मृतदेह काढण्यात आले आहेत. कथितपणे रामपूरहाटमध्ये तृणमूल काँग्रेस नेत्याच्या हत्येनंतर जमावाकडून घरे पेटवण्यात आल्याचं म्हटलं जात आहे.

स्थानिक पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण राजकीय वैरातून झाल्याचे दिसून येत आहे.
सोमवार रात्रीची घटना
मीडिया रिपोर्ट्सनुसार, अग्निशमन विभागाला सोमवारी रात्री जाळपोळ झाल्याची माहिती मिळाली होती. अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा 10-12 घरे जळाली होती. आतापर्यंत एकूण 10 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत.
हिंसाचारामागील कारण काय?
मीडिया रिपोर्ट्सनुसार, तृणमूल काँग्रेसचे नेते आणि बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यात आला. भादू यांच्या मृत्यूनंतर तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते संतापले. यानंतर त्यांच्या समर्थकांनी संशयितांच्या घरांना आग लावली. पोलीसही याला राजकीय शत्रुत्वातून झालेले प्रकरण असल्याचं म्हणत आहेत. मात्र आजूबाजूच्या परिसरातील तणावपूर्ण वातावरण पाहता परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

निदा खानला आश्रय देणं भोवलं, MIM नगरसेवक मतीन पटेल यांच्या मालमत्तांवर छ. संभाजीनगर मनपाचा ‘बुलडोजर’
२२ आमदार घेऊन सुनिल तटकरे आणि प्रफुल पटेल ‘भाजपा’मधून लढणार ; रोहित पवारांचा मोठा दावा….
सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल भाजपमधूनच लढणार ; २२ आमदारही भाजपच्या वाटेवर, रोहित पवारांचा गौप्यस्फोट….
तामिळनाडूमध्ये मोठा धक्का, बहुमत चाचणीत विजय यांना १४४ आमदारांचा पाठिंबा ; एआयएडीएमके मध्ये फूट….
उदगाव बायपासवर पेट्रोलचा टँकर उलटला, १० हजार लिटर पेट्रोल सांडले….
इम्तियाज जलील हेच अर्बन टेररिस्ट! निदा खानला त्यांनीच लपवलं’; संजय शिरसाटांचा थेट हल्ला….