300 जागा जिंकण्याच्या दावा ठरला फोल ; सत्तेच्या संघर्षात कुठे चुकले अखिलेश…?
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
लखनऊ :- उत्तर प्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा मुख्यमंत्रीपदाची शपथ घेऊ शकतात. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव यावेळीही सरकार स्थापन करण्यात अपयशी ठरताना दिसत आहेत..
यूपीमधील निवडणूक निकालांच्या ट्रेंडमध्ये भाजप बहुमताच्या खूप पुढे दिसत आहे. त्याचवेळी समाजवादी पक्षाचा आकडा 122 च्या आसपास फिरत आहे. अशा स्थितीत सत्तासंघर्षात अखिलेश यादव कुठे चुकले, असा प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे.
निवडणूक प्रचार रॅलीमध्ये अखिलेश यादव यांनी पूर्ण आत्मविश्वासाने दावा केला की, सपा पुन्हा एकदा उत्तर प्रदेशात सत्ता स्थापन करणार. सुरुवातीला त्यांनी 400 पारचा नाराही दिला होता. मात्र नंतर त्यांनी 300 पारचा नारा दिला. अखिलेश यादव यांच्या सभांमध्ये मोठी गर्दी होत होती. सपाचा जाहीरनामाही खूप चर्चेत होता. भाजप आणि मुख्यमंत्री योगी यांच्यावर निशाणा साधण्यातही त्यांनी कोणतीही कसर सोडली नाही. आता त्यांचे सर्व दावे फोल ठरताना दिसत आहेत. मात्र सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी करहल मतदारसंघातून मोठी आघाडी कायम ठेवली आहे.
निवडणूक निकालाच्या दोन दिवस आधी एक्झिट पोलचे निकाल समोर आले होते. ज्यामध्ये उत्तर प्रदेशमध्ये पुन्हा योगी सरकार येत असल्याचं दिसत होत. यानंतर अखिलेश यादव यांनी ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित केले होते. यावरून भाजपनेही अखिलेश यांच्यावर हल्लाबोल केला होता.
मतदारांनी घराणेशाहीचे राजकारण नाकारले : भाजप
सध्याच्या ट्रेंडनुसार भाजप चार राज्यांत आघाडीवर आहे. हे पाहता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घराणेशाहीचे राजकारण नाकारण्याच्या आवाहनाला मतदारांनी प्रतिसाद दिल्याचा दावा भाजपने केला आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस (संघटन) बी.एल. संतोष यांनी ट्विट केले की, “यूपीमध्ये भाजपचा विजय. पंजाबमधील आपचा विजय हा नवीन पर्याय आणि नवीन आशाचे आश्वासने देते. मात्र काही लोक सुधारणार नाहीत.”

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….