आ. ससाणेंसह पाच जणांच्या अंतरिम जामिनावरील सुनावणी पुढे ढकलली # उमरखेड नगरपरिषदेतील ६५ लाखांचा कचरा घोटाळा प्रकरण
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड – महागाव :
उमरखेड नगरपरिषद मध्ये झालेल्या ६५ लाखांच्या कचरा घोटाळ्यात तत्कालीन नगराध्यक्ष तथा विद्यमान आमदार नामदेव ससाने सह पाच जणांना अटक पूर्व अंतरिम जामीन मिळाला होता. त्या जामिनावर आज शुक्रवारी पुसद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली. परंतु विद्यमान न्यायाधिशांनी सुनावणी पुढे ढकलली. आता ही सुनावणी सोमवारी (७ मार्च) होणार आहे.
उमरखेड नगर परिषद मध्ये झालेल्या कचरा घोटाळ्यात ६५ लाखांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप याचिकाकर्त्याने केला होता. या घोटाळ्यावर नगर विकास मंत्रालयाने शिक्कामोर्तब करून यात सहभागी असलेल्या अकरा जणांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश दिले होते .त्यावरून उमरखेड पोलिसांनी मुख्याधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आमदार नामदेव ससाने यांच्यासह ११ जणांवर गुन्हे दाखल केले. त्यावरून न्यायालयाने आमदार ससाने सह पाच जणांना अंतरिम जामीन मंजूर केला होता . या अंतर जामिनावर आज सुनावणी पार पडली दरम्यान दोन्ही पक्षाकडील युक्तिवाद ऐकल्यानंतर पुसद येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली असून ही सुनावणी आता सोमवारी होणार आहे.