अर्थसंकल्पीय अधिवेशन वादळी ठरणार ; भ्रष्टाचार , मलिक राजीनामा प्रकरण , एसटी संप , परीक्षा घोळ आदीबाबत विरोधक आक्रमक….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन (Maharashtra Budget Session 2022-23) हे ३ मार्च ते २५ मार्च मुंबईत पार पडणार आहे. दरम्यान, अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी अनेक विषयांवर समोरासमोर येऊ शकतात. यातील सर्वात पहिला मुद्दा म्हणजे अधिवेशनाचं ठिकाण. हिवाळी अधिवेशन हे राज्याच्या पंरपरेनुसार नागपुरात भरवलं जातं. पण गेल्यावर्षी कोरोना संकटामुळे हिवाळी अधिवेशन नागपूर ऐवजी मुंबईत भरवण्यात आलं होतं. पण काही कारणास्तव अर्थसंकल्पीय अधिवेशन हे नागपूर ऐवजी मुंबईतच भरवलं जाणार आहे. या मुद्द्यावरुन विरोधक सरकारला सभागृहात कोंडीत पकडण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री उपस्थित राहणार….?
दरम्यान, हिवाळी अधिवेशन नुकतंच काही दिवसांपूर्वी पार पडलं. फक्त पाच दिवसांचे हे अधिवेशन घेण्यात आले म्हणून यावेळी सुद्धा विरोधक आक्रमक झाले होते. हिवाळी अधिवेशनात प्रकृतीच्या कारणास्तव हजर राहू शकले नव्हते. पण येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्री विधीमंडळाच्या सभागृहात उपस्थित राहणार की नाही? याची जोरात चर्चा सुरु आहे. मागील काही दिवसांपासून राज्यात सत्ताधारी महाविकास आघाडीतील घटकपक्ष आणि विरोधक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आरोप-प्रत्यारोपाच्या प्रचंड फैऱ्या झडताना दिसत आहेत. या घडामोडींचे पडसाद सभागृहात बघायला मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळं हे अधिवेशन वादळी होणार यात शंका नाही.
भ्रष्टाचार, एसटी संप , आरोग्य विभाग, परीक्षा घोळ यावरुन विरोधक आक्रमक
राज्यात मागील काही दिवसांपासून भ्रष्टाचाराचा मुद्दा चांगलाच तापला आहे. भाजप व खासकरुन किरीट सोमय्यांनी मविआच्या मंत्र्यांवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याशिवाय परिवहन मंत्री अनिल परब भ्रष्टाचार, कोविड घोटाळा, एसटी कर्मचाऱ्यांचा लांबलेला संप, आरोग्य विभाग, टीईटी व दहावी बारावी परीक्षांचा घोळ, शेतकऱ्यांची वीज तोडणी, अनलॉक आदी मुद्द्यांवरुन विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनात अर्थसंकल्प मांडण्याआधीच विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील खडाजंगी पुन्हा एकदा या अधिवेशनात पाहायला मिळणार आहे. तसेच आज सांयकाळी विरोधक व सत्ताधारी यांच्यात होणारे चहापानवर नेहमीप्रमाणे विरोधक गैरहजर राहणार आहेत.
नवाब मलिकांचा राजीनाम्याचा मुद्दा पेटणार
अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी हा महत्वाचा मुद्धा विरोधक बनवणार यात शंका नाही. नवाब मलिक यांना ईडीने पैशांच्या अफरातफर प्रकरणी अटक केली आहे. मलिकांना अटक करण्यात आल्यानंतर भाजप नेत्यांकडून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत आहे. तर सत्ताधारी पक्षांकडून भाजपकडून केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर केला जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. विशेष म्हणजे याच आरोपांवरुन मविआकडून केंद्र सरकारवर विरोधात आंदोलने केली जात आहेत. राज्य सरकारने नवाब मलिकांचा राजीनामा घेणार नाही यावर ठाम आहे, तर भाजपकडून जोपर्यंत मलिकांचा राजीनामा घेतला जात नाही तोपर्यंत अधिवेशन पुढे चालू जाणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. या कारणांवरुन सभागृहात गदारोळ होत विरोधक आक्रमक होणार आहेत. दुसरं म्हणजे विधानसभा अध्यक्षांची निवडणूक होणे अपेक्षित आहे. ही निवडणूक पहिल्यांदाच खुल्या पद्धतीने म्हणजेच आवाजी मतदान पद्धतीने होणार आहे. त्यामुळं हे सर्व मुद्यासह अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यातील खडाजंगी सभागृहात पाहायला मिळणार असून, हे अधिवेशन वादळी ठरणार यात शंका नाही.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!