कर्नाटकातील हिंदू युवकाच्या हत्येच्या निषेधार्थ…महागाव शहरात हिंदू बांधवांचा मोर्चा…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव:-
येथील समस्त हिंदू बांधवांच्या वतीने कर्नाटकातील हिंदू बांधव हर्षा यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज ता.२५ रोजी बस स्थानक चौक ते महागाव पोलिस स्टेशन पर्यत जय श्री राम, वंदे मातरमच्या घोषणा देत मोर्चा काढण्यात आले व संबंधित आरोपीस तत्काळ कडक कारवाई करणे बाबत निवेदन देण्यात आले.
कर्नाटक मधील शिमोगा येथे हर्ष नामक कार्यकर्त्यांची निर्घृण हत्या करण्यात आली ती अतिशय निंदनीय व निषेधार्थ आहे.ही हत्या विषारी व जिहादी मनसिकतेतून पछाडलेल्या नेतृत्वामार्फत जे विष अल्पसंख्याक समाजात पेरले गेले त्याचा हा परिणाम आहे.अशी आमची स्पष्ट धारणा आहे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया,सोशल डेमॉक्रॅटिक पार्टी ऑफ इंडिया या संघटनेनी जे विष पसरवण्याचे कार्य सुरू केलेली आहे त्याचा परिणाम म्हणजे ही हत्या आहे.
या समाजघातकी संघटनेचे पाळेमुळे महाराष्ट्रात ही खोलवर रुजले आहेत.त्या वर बंदी घालून योग्य प्रतिबंध करावा, अन्यथा आम्ही कायदेशीर व घटनात्मक मार्गाने याला उत्तर देऊ असे समस्त हिंदू बांधवांच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात मांडले आहे.
या वेळी सामूहिक श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
या वेळी माजी आमदार राजेंद्र नजरधने यांनी सर्वाना संबोधित केले.
मोर्चाला व निवेदन देतांना सुरेश पाटील नरवाडे, शुभम गरुड,गणेश भोयर ,नितीन नरवाडे व्यापारी,सुधीर नरवाडे, सुरज ठाकरे,रुषेकेश कदम, धनराज भारती,सुरज नरवाडे, बाळू नरवाडे, ऋषीकेश मोहटे,सुमित देशमुख, ज्ञानेश्वर चव्हाण,श्रीराम सुरोशे,सुनील रेंगे,खंडू बेलखेडे ,आकाश कदम,प्रफुल नरवाडे,शिवाजी कान्हेकर,रामू गावंडे व असंख्य समाज बांधव उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….