आज एसटी कर्मचाऱ्यासाठी महत्वाचा दिवस ; आज एसटी विलिनीकरणाच्या अहवालावरती मुंबई हायकोर्टात सुनावणी ; सर्वांचे लागले लक्ष….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- एसटी कर्मचारी मागील तीन महिन्यांपेक्षा अधिक काळ राज्य शासनात विलिनीकरण व्हावे यासाठी आंदोलन करताहेत. याचिकेला तारीख पे तारीख मिळताना दिसत आहे. कारण मागील अनेक सुनावणीत कोणताही ठोस निर्णय झाला नाही, त्यामुळं कोर्टाने पुढची तारीख दिली आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या अहवालावर आज सुनावणी पार पडणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून एसटीच्या विलीनीकरणाचा मुद्दा तापला होता. एसटी कर्मचाऱ्यांनी तब्बल तीन महिन्याहून अधिक काळ विलीनीकरणासाठी संप (St Worker Strike) पुकारला आहे. दरम्यान, आज शुक्रवारी विलिनीकरबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
दरम्यान, मागील आठवड्यात मुंबई हायकोर्टात एसटी विलिकरणाच्या याचिकेवर सुनावणी झाली. या सुनावणीवेळी महामंडळाच्या वकिलांना मुख्य न्यायाधिशांनी विचारणा केली. 22 डिसेंबरला न्यायमूर्ती वाराळेंनी एक आदेश दिला होता. 22 डिसेबरला देण्यात आलेल्या आदेशानुसार एक मागणी सोडून बाकी सर्व मागण्या पूर्ण केल्याचं सरकारी वकिलांनी सांगितलं होतं. दोन आठवड्यांनी या आंदोनवार तोडगा निघत नाही असे दिसल्यानंतर राज्य सरकारकडून ऐतिहासिक पगारवाढ करण्यात आली. मात्र तरीही काही कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम राहिल्याने हे आंदोलन चिघळलं. त्यानंतर हे प्रकरण कोर्टात पोहोचलं. त्यामुळे कोर्टाच्या निर्णयाकडे संपूर्ण राज्याचे डोळे लागले होते. या संपामुळे एसटीचे तर नुकसान झालेच आहे. मात्र याची झळ अनेक एसटी कर्मचाऱ्यांना बसली आहे. या संपामुळे अनेक एसटी कर्मचाऱ्यांवर बडतर्फी, सेवासमाप्ती, निलंबन अशा कारवाई करण्यात आल्या आहेत.
मागील सुनावणीवेळी सेवा ज्येष्ठतेनुसार एसटी कर्मचाऱ्यांना पगार वाढही देण्यात आल्याचं सांगण्यात आलं होतं. उच्च स्तरीय समितीचा सीलबंद अहवाल हायकोर्टापुढे सादर करण्यात आला. हा अहवाल पाहिलात का, अशी विचारणा महामंडळाच्या वकिलांना हायकोर्टात करण्यात आली. मुख्य न्यायाधिशांनी महामंडलाच्या वकिलांना ही विचारणा केली. तुम्ही आधी अहवाल पाहा, असं आमचं मत असल्याचं मुख्य न्यायाधिशांनी सांगितलं होतं. तसेच दोन्ही पक्षांकडून अस युक्तीवाद करण्यात आला होता. व तेव्हा निकाल राखून ठेवला होता, त्यानंतर 25 फेब्रुवारी म्हणजे आजची सुनावणीची तारीख दिली आहे, त्यामुळं या सुनावणीकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.