अचानक भोवळ येवून चक्कर आली आणि बेशुद्ध पडले ; आ.रवी राणांवर ICU मध्ये उपचार सुरु….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
अमरावती :- युवा स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष व आमदार रवी राणा यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. ICU मध्ये त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
शाईफेक प्रकरणात राणा यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते. त्यामुळे त्यांनी दिल्ली न्यायालयातुन ट्राझिंग बेल मिळवली. त्यानंतर दुपारी दोन वाजता रवी राणा अमरावतीत आले यावेळी कार्यकर्त्यांनी त्यांचं मोठ्या जल्लोषात स्वागत केले. त्यानंतर शहरात रॅली काढण्यात आली. जयस्तंभ चौकात गांधीजीच्या पुतळ्याजवळ ५ मिनिट मौन पाळल्यानंतर रवी राणा यांना भोवळ आली आणि ते बेशुद्ध पडले.
त्यांना तात्काळ रेडीयंट रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी रवी राणा यांची सर्व प्रकारच्या तपासणी केल्या. सकाळ पासून त्यांनी जेवण न केल्याने त्यांचा रक्तदाब कमी झाल्याने त्यांना चक्कर आल्याचे डॉक्टरांनी सांगीतले. त्यांच्यावर आयसीयुमध्ये उपचार सुरु असून डॉक्टरांनी त्यांना विश्रांतीचा सल्ला दिला आहे.