नवाब मलिक यांच्या अटकेचा राष्ट्रवादी काँग्रेस, युवक राष्ट्रवादी आघाडीच्यावतीने निषेध…..
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
महागाव :- नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर राज्यभरातुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष रस्त्यावर उतरला आहे. महागाव तालुक्यातील राष्ट्रवादी काँगेस व युवक काँग्रेस पक्षाच्यावतीने गुरुवारी (दि.२४) रोजी तहसीलदार महागाव यांना निवेदन देऊन नवाब मलिक यांच्या अटकेचा निषेध करण्यात आला आहे.
केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणाविरुद्ध राज्याचे अल्पसंख्याक मंत्री ना.नवाब मलिक हे आवाज उठवीत होते. त्यामुळे केंद्रीय यंत्रणा ई.डी चा गैरवापर करून व्यक्तीच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी करून आवाज दाबण्याचा प्रयत्न करीत त्यांना अटक केली असून, संविधानानुसार भाजप सत्तेचा वापर न करता सूडबुद्धीने व दमणकारी राजकारण करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न करीत असून ह्या दडपशाहीचा निवेदनाद्वारे निषेध करत राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार विरोधात घोषणाबाजी करून तीव्र संताप व्यक्त केला आहे.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे ता.अध्यक्ष प्रवीण ठाकरे,युवक ता.अध्यक्ष हंसराज मोरे,पंजाबराव पाटील,राष्ट्रवादी महिला ता.अध्यक्ष सौ सुरेखा नरवाडे,राष्ट्रवादी युवक आघाडीचे राम जाधव,राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष गुणवंत राठोड,महागाव शहर अध्यक्ष स्वप्नील अडकीने,राष्ट्रवादी ता.कार्याध्यक्ष वसंतराव जाधव,प्रवीण राठोड,हेमराज राठोड, जिल्हा उपाध्यक्ष विद्यार्थी आदीब खान,अनिस शेख,सोहेल चव्हाण, शंकर कोपनर, प्रतीक नरवाडे,विश्वजित अडकीने,शिवाजी नरवाडेसह राष्ट्रवादी युवक काँग्रेस,राष्ट्रवादी काँग्रेस व महिलासेलचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….