मोठी बातमी ; ईडीने नवाब मलिकांना घेतले ताब्यात ; घरावर छापे….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मलिक यांच्या घरावर सक्तवसुली संचलनालयाने छापे टाकले आहेत.
सध्या मलिक यांना ईडीने ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती मिळत आहे.
नवाब मलिक यांच्या घरी सकाळी साडे सहा वाजता ईडीचे अधिकारी धडकले आहेत. अंडरवर्ल्डशी संबंध असण्याची शक्यता असल्याने ईडीने घरात काही तपासणी केल्याची माहिती देखील मिळत आहे. याआधी अंडरवर्ल्डशी संबंधित इक्बाल कासकर तसेच अन्य काही व्यक्तींची चौकशी करण्यात आली होती. त्यांच्या खात्यात काही आर्थिक व्यवहार झाल्याची माहिती ईडीकडे असल्याचं समोर आलं आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित काही व्यक्ती आणि खात्यांमधून मलिक यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संबंध असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
१९९३ च्या बाँम्बस्फोटातील एका आरोपीची जमीन मलिकांनी विकत घेतली होती. यासंदर्भात काही आर्थिक व्यवहारांची उकल ईडीकडून केली जात असल्याची शक्यता आहे.
सत्तेचा दुरुपयोग करून केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा पाठिमागे लावण्याचा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. ईडी, सीबीआय आणि एनआयए या केंद्रीय तपास यंत्रणांचा दुरूपयोग करून विरोधकांना दाबण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोपही याआधी नवाब मलिक यांनी केला होता.
निवडणुकांच्या आधी शरद पवार यांना ईडीकडून नोटीस बजावण्यात आली. तामिळनाडूमध्ये डीएमकेच्या नेत्यांच्या घरी छापेमारी करण्यात आली. आता उत्तर प्रदेशातही हेच उद्योग सुरू आहेत, असा घणाघात नवाब मलिक यांनी केंद्र सरकारने केला होता. केंद्र सरकारच्या सुडबुद्धीनं सुरु असलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारवर कोणताही परिणाम होणार नाही, सरकार केंद्रात सत्तेत असलेल्या भाजपसमोर झुकणार नाही, असे सांगत नवाब मलिक यांनी राज्यातील भाजप आणि केंद्र सरकारवर निशाणा साधला होता.

माझ्या घरी लवकरच पाहुणे येणार
समीर वानखेडे प्रकरणात आरोप करताना मलिक यांनी महत्वाचं ट्वीट केलं होतं. माझ्या घरी लवकरच सरकारी पाहुणे येणार, असं त्यांनी म्हटलं होते. मात्र पाहुण्यांचा योग्य प्रकारे पाहुणचार करणार असल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….