बारामतीच्या युवतीची इंडिया रेकॉर्ड बुकमध्ये नोंद ; मुंबई ते पुणे १६१ किमी सोलो रनिंग….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- युनिटी फॉर रन या या संकल्पनेतून बारामती येथील सादीया सय्यद या युवतीने मुंबई ते पुणे १६१ कि.मी.अंतर सोलो रनिंग करीत पूर्ण केले. शिवजयंतीच्या निमित्ताने तिने हि दौड पुर्ण केली. या सोलो रनची नोंद २०२२ सालच्या इंडिया रेकॉर्ड बुक मध्ये घेण्यात आली.
१८ फेब्रुवारी रोजी मुंबई पोलीस उपायुक्त राजतिलक रोशन यांच्या शुभहस्ते हिरवा झेंडा दाखवून गेट वे ऑफ इंडिया, मुंबई येथून सादियाच्या सोलो रनला प्रारंभ झाला. हे सोलो रन दोन टप्प्यात पूर्ण करण्यात आले. पहिला टप्पा ९५ किमी मुंबई ते लोणावळा ,तर लोणावळा मुक्कामानंतर लोणावळा ते लाल महाल, पुणे या दुसऱ्या टप्प्यात उरलेले अंतर तिने धावून पूर्ण केले. १९ फेब्रुवारी रोजी संध्याकाळी ३.२० वाजता लाल महाल येथे दीपक मानकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादीयाचे स्वागत केले.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्वीय सहाय्यक सुनीलकुमार मुसळे यांच्या मार्फत सर्व खेळाडूंची निवास व भोजनाची व्यवस्था करण्यात आली. या आदरातिथ्याने खेळाडू चांगलेच भारावले. बारामती मधून पहिला ऑलिम्पिक वीर घडावा हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवण्यात आले आहे. फाऊंडेशनच्या सदस्या सादिया यांच्या कामगिरीने नक्कीच द्विगुणित झाला आहे, असे फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष ननवरे यांनी सांगितले.
सादीयाला प्रोत्साहन देण्यासाठी बारामती स्पोर्ट्स फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष आयर्नमॅन सतिश ननवरे यांच्यास राजू भिलारे नानाजी सातव, अजिंक्य साळी, मच्छिंद्र आटोळे, रवींद्र पांढकर, शिरीष शिंदे, संजयजी जगताप, अशोक (मामा) पवार, राष्ट्रीय नेमबाज खेळाडू शिवानी सातव, वैष्णवी ननवरे आदी उपस्थित होते.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….