घर मिळवण्यासाठी संघर्ष लक्षात ठेवा ; घरं विकून , मुंबई सोडून जाऊ नका ; मुख्यमंत्र्यांचे आवाहन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मुंबईत अनेक लोक पोटापाण्यासाठी येतात आणि राहतात. पण असं हक्काचं घर मिळाल्याने ते विकून सोडून जाऊ नका. तुम्ही आजवर जो संघर्ष केला.
तो कायम लक्षात ठेवा. हक्काचं घर विकून मुंबईबाहेर (mumbai) जाऊ नका, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांनी केलं. गोरेगावच्या पत्रावाला चाळीच्या विकास कामाचं आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते ऑनलाईन भूमिपूजन करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे आवाहन केलं. अनेकांना माहित आहे गेल्या अनेक वर्ष त्याचं दळण दळलं जात होतं. पण प्रश्न सुटत नव्हता. मघाशी उल्लेख झाला. अनेकांनी या चाळीच्या विकासासाठी आंदोलन केले. आजचा हा क्षण पाहायला अनेकजण हयातही नाही. गेल्यावर्षी संघर्ष समितीचे कार्यकर्ते मला भेटायला आले होते. उद्योग मंत्री सुभाष देसाई आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडही (jitendra awhad) उपस्थित होते. त्यानंतर या प्रश्न मार्गी लागला, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.

सुभाष देसाईंनी या कामासाठी पिच्छा पुरवला होता. प्रत्येक भेटीत पत्रावाला चाळीबाबत ते बोलायचे. कामं मोठी आहेत. अडचणी डोंगराएवढ्या आहेत. पण एकदा का अडचणी सोडवायच्या म्हटलं तर त्या सोडवल्या जाऊ शकतात त्याचं हे उत्तम उदाहरण आहे, हा प्रकल्प किती जुना आहे, त्यात काय अडचणी आल्या याचा पाढा वाचणार नाही. चिकाटी असेल तर सर्व काही होतं. जिद्द असली की सर्व काही होतं, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
निदान चहा प्यायला बोलवा
ज्या स्वप्नाची वाट पाहत होतो. ते आज सुरू होत आहे. लवकरच तुम्हाला घरं मिळतील. घरं मिळवण्यासाठी जो संघर्ष केला ते लक्षात ठेवा. विसरू नका. अनेक लोक घराची वाट पाहून निघून गेले. त्यांची आठवण ठेवा. हे घर विकून मुंबई बाहेर जाऊ नका. तुम्ही जिद्दीने संघर्ष केला आणि तो जिंकला, असं सांगतानाच घरं मिळाल्यावर निदान आम्हाला चहा प्यायला तुमच्या घरी बोलवा, असं मिष्किल उद्गार त्यांनी काढले. त्यावेळी एकच खसखस पिकली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….