सवलतीने समाजाचा उद्धार होत नाही , आरक्षण आवश्यक :- हरिभाऊ राठोड़….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ :- यवतमाळात राजकीय नेते एकमेकांवर टीकास्त्र सोडत आहे. संभाजी राजे भोसले हे उपोषणाला बसत आहे. त्याचे हे उपोषण २६ तारखेपासून सुरु होणार आहे. तर, त्यांच्या या उपोषणावर टीका केली जात आहे. या उपोषणावर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी बोचऱ्या शब्दात टीका केली आहे.
फक्त, सवलती देऊन समाजाचा उद्धार होत नाही. जर खरोखरच विकास करायचा असेल तर, विकासासाठी आरक्षण अतिशय आवश्यक आहे. खासदार भोसले हे सर्व समाजाचे नेते आहेत. त्यामुळे, त्यांच्याकडून सर्वांच्याच हिताची कामे होतील,अशी अपेक्षा आहे. त्यांनी आरक्षणासह मागासवर्गीय कर्मचारी, ओबीसी, राजकिय आरक्षण आदी प्रश्नांवर आवाज उठवला पाहिजे, असा सल्लाही माजी खासदार हरिभाऊ राठोड यांनी दिला.