माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फिरोज दोसानी यांची निवड….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
नांदेड :- माहूर नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे फिरोज दोसानी यांची निवड झाली आहे. अध्यक्षपदाच्या या निवडीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चुरशीची लढत पहायला मिळाली.
जिल्ह्यातील अर्धापूर, नायगाव आणि माहूर नगरपंचायतींसाठी निवडणुकांमध्ये आर्धापूर आणि नायगावमध्ये काँग्रेस आघाडीवर आहे. मात्र माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेची आघाडी घेतल्याने नगराध्यक्ष पद कुणाकडे जाते, याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. अखेर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनंतर सर्वाधिक जागा मिळवणाऱ्या शिवसेनेने किंगमेकरची भूमिका बजावत काँग्रेसला जबरदस्त झटका दिला. शिवसेनेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्याने याच पक्षाच्या फेरोज दोसानी यांच्या गळ्यात अखेर नगराध्यक्षपदाची माळ पडली. नांदेड काँग्रेस आणि पर्यायानं मंत्री अशोक चव्हाण यांच्यासाठी हा मोठा झटका समजला जात आहे.
राष्ट्रवादीचे फिरोज दोसानी यांची माहूरच्या नगराध्यक्षपदी निवड
शिवसेना किंगमेकर, काँग्रेसला झटका
माहूर नगरपंचायत निवडणुकीत अध्यक्षपदाचं राजकारण गेल्या काही दिवसांपासून चांगलंच रंगलं होतं. ते केवळ माहूरपुरतं मर्यादित न राहता किनवट- माहूर विधानसभा मतदारसंघापर्यंत पोहोचलं होतं. माहूर नगरपंचायतीच्या मतदानात पुढीलप्रमाणे पक्षीय बलाबल दिसून आले.
राष्ट्रवादी काँग्रेस- 7
काँग्रेस- 6
शिवसेना- 3
भाजप- 1
एकूण- 17
नगराध्यक्षपदासाठी राष्ट्रवादीने अल्पसंख्याक मुस्लिम तरुण फिरोज दोसानी यांना पुढे केले होते. पक्षीय बलाबल आणि महालिकास आघाडीतील सूत्रानुसार, राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकार असताना काँग्रेसने विनाकारण अध्यक्षपदावर अतिक्रमण करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे मुस्लिम समाजातून रोष व्यक्त केला गेला. त्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक काँग्रेससोबत सहलीला गेल्याच्या चर्चाही होत्या. अखेर शिवसेनेने राष्ट्रवादीला पाठींबा दिला आणि काँग्रेसला झटका दिल्याचे पहायला मिळाले.
भाजपचा एकमेव सदस्य तटस्थ
तीर्थक्षेत्र माहूर नगर पंचायतीच्या नगराध्यक्षपदी सेनेच्या पाठिंब्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे फेरोज दोसानी विजयी झालेत. सहा सदस्य असलेल्या काँग्रेसने शिवसेनेच्या पाठिंब्याने नगराध्यक्ष पदासाठी जुळवाजुळव केली होती. पण शिवसेनेने आज राष्ट्रवादीला पाठींबा दिल्याने काँग्रेसला मोठा झटका बसलाय. तर या निवडणुकीत भाजपाचा असलेला एकमेव सदस्य तटस्थ राहिलाय. नगराध्यक्षपदाची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जल्लोष करत घोषणाबाजी केली.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….