राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा नक्षलवाद्याकडून जीवे मारण्याच्या धमकी ; सुरक्षेत वाढ….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- राज्याचे नगरविकास मंत्री आणि ठाणे तसेच गडचिरोलीचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा जिवे मारण्याच्या धमकीचे पत्र नक्षलवाद्यांकडून पाठवण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. गडचिरोलीत नक्षलवाद्यांना मारल्याचा बदला घेण्याची धमकी या पत्रातून देण्यात आली आहे. त्यामुळे शिंदे यांच्या संरक्षणात पुन्हा वाढ करण्यात आली असून दक्षता घेतली जात आ
गडचिरोलीतील कारवाईचा बदला घेण्याचा इशारा
सूत्रांच्या माहितीनसार, शुक्रवारी येथे एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी एक पत्र मिळाले. त्यात नक्षलवाद्यांनी गडचिरोलीतील कारवाईचा बदला घेण्यात येईल, असा धमकीवजा मजकूर लिहिला आहे. त्यानंतर त्यांच्या सुरक्षाव्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. मागील वर्षी नोव्हेंबरमध्ये गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत २५ नक्षलवादी मारले गेले होते. त्यात एका कमांडरचाही समावेश होता. याबाबत सूत्रांच्या माहितीनुसार धमकीचे पत्र मिळाल्यानंतर ठाणे पोलिसांनी तक्रारीच्या आधारे गुन्हे शाखेकडे तपास सोपविला आहे.
तत्पूर्वी माध्यमांशी बोलताना शिंदे यांनी सांगितले होते की, यापूर्वीही अशा प्रकारच्या धमक्या मिळाल्या आहेत. गडचिरोलीचा पालकमंत्री या नात्याने जिल्ह्याचा विकास करणे हे माझे कर्तव्य आहे. जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करणे आणि मुख्य प्रवाहात आणण्याचा आमचा उद्देश आहे. गडचिरोलीत नक्षलवादाच्या समस्येचा निपटारा करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे विकास करणे हाच आहे, असेही शिंदे म्हणाले होते.
ऑक्टोबरमध्येही शिंदे यांना धमकीचे पत्र
यापूर्वीही मागील वर्षी ऑक्टोबरमध्येही शिंदे यांना धमकीचे पत्र मिळाले होते. त्यावेळी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्याचा तपास ठाणे खंडणीविरोधी पथक करत होते. मुंबईतील मलबार हिल येथील शिंदे यांच्या सरकारी निवासस्थानी ४ ऑक्टोबरला धमकीचे पत्र आले होते. शिंदे यांच्या जिवाला धोका असल्याचे पत्रात नमूद करण्यात आले होते, असे एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले होते. शिवाय एका कमिटीच्या नावाने हे पत्र आले होते. ‘गडचिरोलीमध्ये तुम्ही भरपूर विकासकामे करीत आहेत,’ असेही या पत्रात लिहिल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले होते. ‘बदला’ घेण्याची भाषा या पत्राद्वारे केली होती. या प्रकरणी वागळे इस्टेट पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. या धमकीनंतर शिंदे यांच्या सुरक्षाव्यवस्थेमध्ये वाढ करण्यात आली होती.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….