आज तहसील कार्यालावर हळद उद्योगास मिळणारे कर्ज व हळद प्रक्रियेवर मार्गदर्शन ; शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६७७७
महागाव :
आत्मनिर्भर भारत अभियान अंतर्गत सूक्ष्म अन्न प्रक्रिया हळद या विषयावर मार्गदर्शन आणि चर्चा सत्र आज तहसील कार्यालयातील सभागृहात सकाळी ११ वाजता होणार आहे.त्यासाठी महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तज्ञ संचालक यवतमाळ तथा जनआंदोलन आधार संघर्ष समितीचे संचालक जगदीश नरवाडे यांनी केले आहे.
हळद उत्पादक प्रक्रिया व उद्योग दरम्यान आर्थिक येणाऱ्या अडचणी त्यावर मात करण्यासाठी विशेष मार्गदर्शन सचिन माळकर करणार आहेत..तसेच हळद प्रक्रिया उद्योगासाठी कमाल ३५ लाखापर्यंत देण्यात येणाऱ्या कर्ज व कर्जातील मिळणारी १० लाखापर्यंत सबसिडी बाबत विशेष मोफत मार्गदर्शन करण्यात येणार असल्याची माहिती जगदीश नरवाडे यांनी यावेळी दिली आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी शासनाच्या योजना मिळण्याकरिता व हळद उत्पादन वाढीसाठी या मार्गदर्शन आणि कर्ज सत्रात मोठ्या संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.