राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच , “आदित्य” हा शब्द मागे घेतो :- अजित पवारांचं स्पष्टीकरण…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- पुण्यात वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज (शनिवारी) उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठक पार पडली.
त्यावेळी मागे लावलेले निर्बंधच कायम राहणार असल्याचं अजित पवार यांनी स्पष्ट केलं. दरम्यान माध्यमांशी बोलताना अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचा उल्लेख मुख्यमंत्री असा केला आहे. यावरून सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान बैठकीनंतर पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवार यांनी चर्चांना अखेर फुलस्टाॅप दिला आहे.
‘राज्यात कोरोना संसर्गामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता दिवसा जमावबंदी आणि रात्री नाईट कर्फ्यु लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र ऑक्सिजनची मागणी वाढली तर त्याबद्दलचे निर्णय ‘मुख्यमंत्री या नात्यानं आदित्य ठाकरे साहेब’ घेतील..असं अजित पवार यांनी म्हटलं होतं. बोलताना आदित्य ठाकरे यांचाच मुख्यमंत्री असा उल्लेख केल्याने सोशल मिडियावर या व्हिडिओची जोरदार चर्चा रंगली होती.
दरम्यान यानंतर अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली की, ‘मी आदित्य हा शब्द मागे घेतो आणि त्याठिकाणी उद्धवजी हा शब्द देतो. आमच्यात असा कोणताही गैरसमज नाही. आमचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरेच आहेत’, असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….