अन् तुम्ही माझी औकात काढताय , ‘तो’ पराभव विसरलात का…? ; धनंजय मुंडेंचा हल्लाबोल….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
बीड 20 डिसेंबर :- भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंवर टीका केल्यानंतर आता धनंजय मुंडे यांनी त्यांना प्रत्युत्तर दिलं आहे.
तुम्ही 32 नंबरच्या खात्याचे मंत्री म्हणत पंकजा मुंडेंनी केलेली टीका धनंजय मुंडेंच्या चांगलीच जिव्हारी लागल्यानं धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेचा खरपूस समाचार घेतला. केजमधील नगरपंचायतच्या प्रचार सभेत धनंजय मुंडे यांनी तुफान फटकेबाजी केली आणि पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं. यामुळे बीडमध्ये मुंडे बहिण भावात पुन्हा एकदा जुंपल्याचं दिसून आलं. काय म्हणाल्या होत्या पंकजा मुंडे? नगरपंचायतच्या निवडणूक आखाड्यात पंकजा आणि धनंजय यांची प्रतिष्ठा पणाला लागली, यातच प्रचाराच्या अंतिम टप्प्यात जुगलबंदी सुरू झाली.
वडवणी नगरपंचायतच्या जाहीर सभेत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर सडकून टीका केली होती. निवडणुकीच्या तोंडावर कोटीची घोषणा करतात… दोन वर्ष काय टाळ कुटत होते का? तुम्ही 32 व्या नंबर चे मंत्री आहात काय कोटी निधी आणणार?
असा सवाल उपरोधिक टोला पंकजा मुंडे यांनी लगावला होता. यावर धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर दिलं आहे. वाचा : 2 वर्ष काय टाळ कुटत होते का? पंकजांचा धनंजय मुंडेंना थेट सवाल धनंजय मुंडेंचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर भाजपचे कमळ बिडातून गायब होतं…
केज नगरपंचायतमध्ये साधा एकही उमेदवार मिळत नाही. एवढी वाईट वेळ भाजपवर आली. एक उमेदवार उभा करताना तुम्ही माझी औकात काढता.. ताई औकात काढताना दोन वर्षापूर्वीचा निकाल तर लक्षात ठेवा.
तुम्ही माझ्यावर टीका करा, कारण तुम्ही माझ्या ताई आहेत. यापूर्वी देखील 10 वेळा तुम्ही टीका केली असेल… पण आता सामजिक न्याय आणि विशेष विभागाची औकात काढली. ताई सामाजिक न्याय विभागाची औकात काढून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान केला असं देखील धनंजय मुंडे म्हणाले.
हे विसरलात का? 2019 ला निवडणूक लढवत होता त्यावेळी महिला बालकल्याण, जलसंधारण, ग्रामविकास या खात्याचे नंबर मला माहित नाहीत मात्र हे सगळं असताना परळीच्या जनतेने औकात दाखवून दिली हे विसरलात का? बीड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांवर संकटं असताना ताई आपण कुठे होतात? बीड जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यावर 502 कोटी अनुदान मिळवून दिले. शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले.
25 % अग्रीम विमा दिला, ही आमची औकात… सामजिक न्याय विभागाला कमी समजू नका. वाचा : ‘एकटं लढूनच दाखवा’, अमित शहांचं थेट उद्धव ठाकरेंना ओपन चॅलेंज …म्हणून पवारांनी मला हे खातं दिलं राज्यातील 35 % लोकांच्या संपर्कात आहे. या विभागात काय नाही, विधवा परित्यक्ता, किन्नर, अंध अपंग, दलित वंचित आहेत.
याच विभागात किती जणांचा अपमान केला.. 32 व्या नंबरचे खाते 1 नंबरला नेऊ शकतो हा विश्वास पावर साहेबांना आहे. त्यामुळं त्यांनी हे खात मला दिलं. तुमच्याकडे टॉप फाईव्ह मधील ग्रामविकास, महिला बालकल्याण, जलसंधारण, अशी महत्वाची खाते घेऊन निवडणुकीत हारलात. म्हणून किसीं की हैसीयत और औकात पे मत जाना पाच वर्षात तुम्ही मंत्री असताना आमदार, खासदार, राज्यात केंद्रात सत्ता होती तरी देखील केजमध्ये मूलभूत सुविधा नाहीत. शेवटी मै मेरी औकात बताके रहूंगा.. असंही धनंजय मुंडे म्हणाले.