धक्कादायक ; ऐश्वर्या बच्चनला ईडीचा समन्स….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- मनोरंजन विश्वातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अभिनेत्री ऐश्वर्या रायच्या अडचणींमध्ये सापडली आहे. पनामा पेपर्स लीक प्रकरणी ईडीने ऐश्वर्या रायला समन्स बजावण्यात आला आहे.
त्यामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या रायला आज दिल्लीतील ईडी कार्यालयात हजार रहावं लागणार आहे. पनामा पेपर्स प्रकरणात भारतातील सुमारे 500 लोकांचा समावेश होता. यामध्ये अभिनेते, खेळाडू, व्यापारी अशा प्रत्येक वर्गातील प्रमुख व्यक्तींची नावे आहेत.
पनामा पेपर्स प्रकरणाची अनेक दिवसांपासून चौकशी सुरू आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांनी तपासात देशातील अनेक बड्या व्यक्तींचा समावेश केला आहे. अनेकांची झडती घेतली आहे. त्यामुळे आता याप्रकरणात ऐश्वर्याचं नाव समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.
दरम्यान, ब्रिटेनमध्ये पनामाच्या लॉ फर्मचे 11.5 कोटी टॅक्स डॉक्युमेंट लीक झाले होते. यामध्ये जगभरातील बडे नेते, उद्योगपती आणि बड्या व्यक्तींची नावे समोर आली होती. याविषयी अजून चौकशी सुरु आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….