जळत्या हेलिकॉप्टर मधुन तिघे आले बाहेर ; प्रत्यक्षादर्शीनी सांगितली….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उटी :- तामिळनाडू जवळ झालेल्या कुन्नुर अपघातात वायुसेनेच्या हेलिकाॅप्टर दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. भारताचे सीडीएस बिपिन रावत (Bipin Rawat) यांच्यासोबत १४ जण या हेलिकॉप्टरमध्ये होते.
यातील ११ जणांचे मृतदेह हाती लागले आहेत. तर बिपिन रावत यांना हाॅस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या हेलिकाॅप्टरमधून बिपीन रावत हे वेलिंग्टनच्या डिफेंस स्टाफ काॅलेजमध्ये जात होते. याचवेळी ही दुर्घटना घडली.
तामिळनाडूतल्या कुन्नूर परिसरात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळले. प्रत्यक्षदर्शी नागरीकाने घटनेचे वर्णन सांगितले आहे. त्याचे नाव कृष्णासामी आहे. त्या घटनेचे प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी हेलिकॉप्टर कोसळताना तीन लोक यातून बाहेर उडी घेत असल्याची माहिती समोर आली आहे.
इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, “मला प्रथम मोठा आवाज ऐकू आला. काय झाले ते पाहण्यासाठी मी बाहेर आलो. एक हेलिकाॅप्टर एका झाडावर आदळून दुसऱ्या झाडावर आदळत पेटले. जेव्हा ते आदळत होते तेव्हा त्याला आग लागली होती. यावेळी ३ जणांनी त्यातून उडी मारली. यावेळी मी साथीदारांनी एकत्र केले आणि बचाव कार्य सुरु केले. जेवढे मृतदेह मिळाले तेव्हा ते ८० टक्के भाजलेले होते.
दरम्यान राजभवन येथे नव्याने तयार करण्यात आलेल्या दरबार हॉलचे उद्घाटन राष्ट्रपती रामनाथ कोवींद यांच्या हस्ते होणार होते. मात्र तामिळनाडू येथे हेलिकॉप्टर दुर्घटना झाल्याने त्या पार्श्वभूमीवर हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..