अडीच हजार पोलीस , लाल कार्पेट , फुलांची भव्य सजावट ; राष्ट्रपतींच्या महाराष्ट्र दौऱ्यासाठी रायगड किल्ला सज्ज….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे स्वराज्याची राजधानी असलेल्या रायगडाला भेट देणार आहेत. खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांनी राष्ट्रपतींना रायगड भेटीचे निमंत्रण दिले होते.
ते निमंत्रण राष्ट्रपतींनी स्वीकारले असून, पुढील महिन्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद रायगडाला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मृतींना अभिवादन करणार आहेत. स्वतः संभाजी राजेंनी याबद्दलची माहिती दिली.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद आज किल्ले रायगडाला भेट देणार आहे. या पार्श्वभुमीवर पाचाड आणि रायगड परिसराला पोलीस छावणीचे स्वरुप प्राप्त झाले आहे. रायगडाकडे जाणारे सर्व रस्ते पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तासह, एसपीजी कमांडोजही तैनात करण्यात आले आहेत.
यावेळी संपूर्ण परिसरात तब्बल अडीच हजार पोलीस अधिकारी कर्मचारी, त्याचबरोबर राष्ट्रीय सुरक्षा दलाचे कमांडो, राज्य राखीव दल, शिघ्र कृती दलाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. राष्ट्रपती कोविंद राजसदरेवर महाराजांच्या सिंहासनावरुढ पुतळ्याला अभिवादन करतील. यानंतर होळीचा माळ आणि शिवाजी महाराजांच्या समाधी स्थळाला राष्ट्रपती भेट देणार आहेत. यावेळी त्यांच्या सोबत खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले हे सुद्धा असणारा आहेत.

दरम्यान, यापूर्वी 5 जानेवारी 2014 रोजी झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या आधी भाजपाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार म्हणून घोषित झाल्यानंतर नरेंद्र मोदींनी रायगडाला भेट दिली होती. नरेंद्र मोदी यावेळी प्रथमच रायगडच्या दौऱ्यावर आले होते.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..