विधानसभेचा अध्यक्ष कॉंग्रेसचा राहणार :- नाना पटोले….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
मुंबई :- विधानसभा अध्यक्षांची निवड विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनातच होईल, अशी माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसकडेच राहील, असे त्यांनी सांगितले.
करोनामुळे आतापर्यंत झालेल्या अधिवेशनाचा कालावधी कमी होता. अधयक्षपदाच्या निवडणूक प्रक्रियेसाठी तीन दिवसांचा कालावधी लागतो, त्यामुळे अध्यक्षाची निवड आतापर्यंत झाली नाही. हिवाळी अधिवेशनात मात्र अध्यक्षाची निवड होईल व ती आवाजी मतदानाने होईल, असे पटोले म्हणाले.
विधानसभा अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदानाने करण्याची पद्धत देशातील सर्वच राज्यांमध्ये आहे. आपल्याकडे गुप्त मतदान पद्धतीने मतदान होत असे. पण नियमात बदल केल्याने राज्यातही विधानसभा अध्यक्षाची निवड ही आवाजी मतदानाने होईल, असे पटोले यांनी सांगितले. हिवाळी अधिवेशनातच अध्यक्षांची निवड केली जाईल, असे पटोले हे सांगत असले तरी राष्ट्रवादी आणि शिवसेनेची भूमिका महत्त्वाची असेल. पावसाळी अधिवेशनात काँग्रेसने मागणी करूनही महाविकास आघाडीतील दोन मित्र पक्षांनी त्याला दाद दिली नव्हती.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..