नवा व्हरिएंट ; राज्यात पुन्हा निर्बंध :- अजित पवार यांचे संकेत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुणे :- राज्यात कोरोनाचा धोका कमी झाला तरी परिस्थिती पूर्णपणे आटोक्यात आलेली नाही. आज आपल्याकडे परिस्थिती बरी आहे. परंतु जागतिक पातळीवर नवीन व्हेरिएंटचा फैलाव होत आहे.
उद्या पंतप्रधानत मुख्यमंत्र्यांची व्हीसी घेणार आहेत. काही बंधनं आणावी लागतील, अशी स्थिती आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. यावेळी त्यांनी पुन्हा निर्बंध लागू होण्याचे संकेत दिले आहेत.
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेतील नव्या व्हेरियंटने चिंता वाढवली आहे. (new coronavirus variant found) तर WHO कडून नव्या व्हेरियंटचं नाव ओमिक्रॉन असे देण्यात आले आहे. या नव्या व्हेरियंटमुळे जगभरात पुन्हा लॉकडाऊनची भीती व्यक्त होत आहे. आता भारतातही निर्बंध येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. पंतप्रधान मोदी यांनी तातडीची बैठक बोलावली आहे.
दरम्यान, कोरोनाचा उद्रेक कमी झाल्याने पुणे जिल्ह्यात समारंभांसाठी 50 टक्केच बंधन हटवण्यात आले आहे. शाळा पूर्ण क्षमतेने सुरू होत आहेत. कोविडमुळे मृत्य झालेल्याच्या नातेवाईकांना 50 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान देण्याचा GR काढलेला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी यावेळी दिली.

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..