पुसद च्या बिरसा ब्रिगेड संघटन मध्ये पदाधिकाऱ्यांच्या नवीन कार्यकारणी चे गठन…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुसद :- सामाजिक समस्येला वाचा फोडण्यासाठी आंदोलनातून व विविध मार्गाने बिरसा ब्रिगेड अग्रेसर असल्याने ब्रिगेडची सामाजिक व राजकीय वर्चस्व वाढत असल्याने ब्रिगेड मध्ये सामील होण्यासाठी मागील अनेक महिन्यांपासून इच्छुकांची गर्दी वाढली होती त्या अनुषंगाने बिरसा ब्रिगेड चे संस्थापक अध्यक्ष सतीशदादा पेंदाम यांच्या आदेशानुसार व ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे यांच्या मार्गदर्शनाखाली ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष मारोती भस्मे यांच्या सहमतीने अनेक पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्याचा समारंभ आयोजित करून अनेक इच्छुकांना सामाजिक कार्याची संधी उपलब्ध करून दिली आहे.
क्रांतिवीर बिरसा मुंडा यांच्यासह महामानवांच्या विचारांवर चालणाऱ्या बिरसा ब्रिगेड च्या वतीने पुसद येथील विश्रामगृहावर 07 नोव्हेंबर 2021 रोजी सकाळी अकरा वाजता बिरसा ब्रिगेडचे मार्गदर्शक तथा माजी जिल्हा परिषद सदस्य परशराम डवरे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले होते. यावेळी मंचावर बिरसा ब्रिगेडचे विदर्भ अध्यक्ष पांडुरंग व्यवहारे, तालुकाध्यक्ष मारोती भस्मे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते अनंत माळकर व पांडूरंग मळघणे या पाहुण्यांच्या उपस्थितीत व मान्यवरांच्या हस्ते नियुक्तीपत्र देऊन पदाधिका-यांना शुभेच्छा देण्यात आल्या .
त्यामध्ये महिला बिरसा ब्रिगेडच्या तालुका अध्यक्ष पदी सौ.सुनीताताई पांडुरंग मळघणे, उपाध्यक्ष सौ.गोकुळा ताई बोडखे , सचिव पदी सौ.शांताताई बेले तर बिरसा ब्रिगेड च्या शहर कार्याध्यक्ष पदी संदेश पांडे, शहर सचिव पंकज वंजारे , तालुका विद्यार्थी अध्यक्ष पदी अक्षय व्यवहारे, तालुका उपाध्यक्ष पदी अतिष वाघमारे , हर्षी सर्कल अध्यक्ष पदी राजू पेदेवाड याची नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली या सर्व नवनियुक्त पदाधिकारी यांचे हार्दिक अभिनंदन व पुढील सामाजिक कार्याला हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आशिष बोके यांनी तर उपस्थितांचे आभार मारोती भस्मे यांनी मानले.


उन्हात तडफडून… ; मनोज जरांगे निर्णयावर ठाम, सरकारला दिला शेवटचा इशारा…
डोक्यावर भगवा रुमाल, खाली बाज टाकली, रखरखत्या उन्हात मनोज जरांगेचं उपोषण ; सरकारची नवीन पाच आश्वासने कोणती..?
पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….