हिवरा येथे चार लाखाची धाडसी चोरी…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
हिवरा (अनिल बोम्पीलवार) :-
हिवरा येथील सेवानिवृत्त शिक्षक रवींद्र वसंतराव कोंडोलिकर हे काही कामानिमित्त आपल्या संपूर्ण कुटुंबासह काल दि. ४ ऑक्टोबरला बाहेर गावी गेले होते या संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी दिनांक ४ चे रात्री त्यांच्या घराच्या मुख्य दाराचे कुलूप न फोडता घराच्या , मागील बाजूकडील टिन काढून घरांमध्ये प्रवेश केला. घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पसरून टीव्ही रॅकच्या कप्प्यांमध्ये ठेवलेले नगदी रक्कम दोन लाख रुपये व काही वर्षापूर्वी खरेदी केलेले त्यावेळच्या किमतीनुसार एक लाख 90 हजारांचे सोन्याचे दागिने असा जवळपास चार लाख रुपयांचा ऐवज चोरट्यांनी चोरून नेला आज दिनांक पाच ला कोंडोलिकर कुटुंब हे सकाळी दहाच्या दरम्यान बाहेर गाऊन घरी आल्यानंतर त्यांच्या हा प्रकार लक्षात आला कोंडोलिकर यांचा पुतण्या एम. एस. सीअंतिम वर्षात असून त्यांची शैक्षणिक फी भरण्यासाठी नुकतेच कोडोंलिकर यांनी दोन लाख रुपयांची जुळवाजुळव करून ठेवली होती. घटनेची तक्रार महागाव पोलिसांना देतात पोलिसांनी त्वरित घटनास्थळाला भेट देऊन श्वानपथका ला पाचारण केले असता घरा जवळच काही अंतरावर जाऊन श्वान घुटमळले . हिवरा व परिसरात गेल्या काही दिवसात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलिसांपुढे चोरट्यांनी आव्हान निर्माण केले आहे.

_____________________
हिवरा येथे कायमस्वरूपी पोलिस चौकीची मागणी….
हिवरा हे गाव परिसरातील एक मोठी बाजारपेठ म्हणून ओळखली जाते. शाळा भुसार मार्केट त्याचबरोबर बँक व इतर कामासाठी ये-जा करणाऱ्यांची येथे नेहमी वर्दळ असते. त्यामुळे येथे चोरीच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे काही कालावधी पूर्वी खुनासारखे प्रकार सुद्धा घडले आहेत त्याच अनुषंगाने गुन्हेगारांवर वचक राहावा व शांतता सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी येथे कायमस्वरूपी पोलीस चौकी नेमण्यात यावी यासाठी येथील सामाजिक कार्यकर्ते संजय राखडे यांनी गावातील नागरिकांच्या सह्यानिशी जिल्हाधिकारी यवतमाळ यांच्याकडे निवेदन देऊन मागणी केली आहे.


पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…