कृषीदूतांनी दिली गांडुळखत निर्मिती केंद्राला भेट
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख : ७२४९-४४४-८८८
उमरखेड :
येथील कृषिभुषण बाबारावजी जाधव यांच्या सेंद्रीय शेती व गांडुळखत निर्मिती केंद्राला नुकतीच उमरखेड कृषि महाविद्यालय अंतर्गत ग्रामीण कृषि कार्यानुभव कार्यक्रमाच्या कृषिदूतांनी भेट दिली व गांडुळखताचा एक बेड भरण्यास मदत केली.
उमरखेड (जि.यवतमाळ) येथील कृषिभुषण बाबाराव जाधव यांनी खुप वर्षांपूर्वी सेंद्रिय शेतीला सुरवात केली. त्यासाठी सुरू केलेल्या गांडूळ खत उत्पादन प्रकल्पाची वाटचाल व्यावसायिक उत्पादनापर्यंत पोचली आहे. एक बेडपासून सुरू झालेला प्रवास आज पाच बेड पर्यंत पोहचला आहे,सेंद्रिय शेतीसाठी त्यांना,भारत सरकारचा उत्कृष्ट शेतकरी ,महाराष्ट्र सरकारचा कृषिभूषण ,जिल्हास्तरीय असे अनेक पुरस्कार प्राप्त झाले आहे. कृषीदुत शीलवान वाढवे, शेख सोहेल, संकेत वानखेडे, आशीष कदम, धीरज मस्के यांनी गांडुळखत निर्मिती तसेच सेंद्रिय शेती अश्या अनेक विषयांवर त्यांच्याशी चर्चा केली .
यावेळी कृषि महाविद्यालयाचे प्राचार्य एस.के.चिंतले व ग्रामीण कृषी कार्यानुभव अधिकारी आर.के.सपकाळ,व तसेच विषयतज्ञ (मृदाशास्त्र) प्राध्यापिका सोळंके यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….