निराधार महिलेला मिळाली प्रशासनाची मदत…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
पुरूषोत्तम कुडवे :- 9370464824
दिग्रस :- शहरानजिकच्या देऊरवाडा या गावात 34 वर्षीय मतिमंद महिला निराधार झाली होती. वडिलाचे 5 वर्षापुर्वी वृध्दापकाळाने निधन झाले तेव्हा पासुन वयस्कर आई व हि महिला राहत होती. जुलै महिन्यात आई देखिल दिर्घ आजाराने मरण पावली. आई होती तेव्हा या महिलेला तिचा मोठा आधार होता. मात्र आई मरण पावल्याने हि महिलेचे छत्र हरवले, गावात हि महिला बेवारस फ़िरत होती जे मिळेल ते खात होती. कुणिही आधार नसल्याने एखाद्या व्यक्तिची वाईट नजर पडल्यास तिच्या सोबत काहि विपरित घडु शकेल हि शक्यता ओळखुन गावातील नागरीक व शरद आडे यांनी दिग्रसचे तहसिलदार राजेश वझिरे यांची भेट घेतली व निवेदन दिले.
परिस्थितीचे गांभिर्य लक्षात घेवुन लक्षात घेऊन तहसिलदार राजेश वझीरे यांनी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेन्द्र राजुरकर यांना संपर्क साधुन महिलेला मदत करण्याचे कळविले.
त्यानंतर जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनात गावात भेट देऊन प्रत्यक्ष परिस्थिती बघण्यात आली व महिलेला नागपुर येथे रवाना करण्यात आले. या निराधार महिलेला योग्य उपचार व संरक्षण देण्यात आले. वेळीच मदत मिळाल्याबद्दल शरद आडे व देऊरवाडा येथिल नागरिक यांनी समाधान व्यक्त केले व तहसिलदार व प्रशासनाचे आभार मानले.
हि संपुर्ण कार्यवाही जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी ज्योती कडु व दिग्रसचे तहसिलदार राजेश वझिरे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली व यासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी देवेन्द्र राजुरकर, वन स्टॉप सेंटर च्या केन्द्र प्रशासक सोनाली पाटील, सपना शिंदे व वन स्टॉप सेंटरचे कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले.

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या ‘या’ प्रलंबित मागण्या होणार पूर्ण….
स्वबळावर लढायची खाज असेल तर मिटवून टाकू; एकनाथ शिंदेंच्या आमदाराचा भाजपला कडक इशारा…..
पुण्यातील जैन बोर्डिंग प्रकरणात रविंद्र धंगेकरांचा माघार घेण्यास नकार; एकनाथ शिंदेंचे नाव घेत म्हणाले, “शिवसेना हा.”
मोहोळांविरोधात रान उठवल्यामुळे शिवसेनेतून हकालपट्टी? चर्चा रंगताच धंगेकर स्पष्टच बोलले, म्हणाले…
मुख्यमंत्रिपदाचा चेहरा ठरला; बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसची राष्ट्रीय ताकद तेजस्वी यादव यांच्यामागे..!
आता महाराष्ट्रात मोठा राजकीय धमाका होणार…!