भांब येथील तरुण शेतकऱ्याचा पाण्यात बुडून मृत्यू ; महागाव तालुक्यातील घटना
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख :९६३७८८६७७७
महागाव
शेतात काम करण्यासाठी निघालेल्या तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना महागाव तालुक्यातील भांब येथे दुपारी साडेबाराच्या सुमारास उघडकीस आली आहे.रोहन तुळशीराम भालेराव (१९) असे मृतक तरुण शेतकऱ्याचे नाव आहे.
मिळालेल्या प्राप्त माहितीनुसार,
नेहमीप्रमाणे रोहन हा शेताकडे निघाला होता.
काही वेळाने रोहण हा भांब गावालगत असलेल्या सिमेंट बंधाऱ्यात बुडत असल्याचे लहान मुलांच्या निदर्शनात आले.त्यांनी गावाकडे धाव घेत रोहनला वाचविण्यासाठी आर्त हाक दिली.गावातील काही धाडसी तरुणांनी बंधाऱ्याच्या पाण्यात उडी घेवून रोहनचा शोध घेत त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला.मात्र सतत सुरू असलेल्या मुसळधार पावसाने त्याच्या शोध कार्यात मोठ्या अडचणी निर्माण होऊ लागल्या.परंतु अखेर दुपारी साडेबाराच्या सुमारास
पाण्यातील खोल भागात एका आडव्या पडुन असलेल्या झाडात अडकलेला रोहनचा मृतदेह आढळून आला.
रोहन हा तुळशीराम यादव भालेराव यांना एकुलता एक मुलगा असल्याने कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे अशी माहिती ॲड. डि.बी. नाईक यांनी दिली आहे.

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….