चोरीच्या आठ मोटरसायकल सह आरोपींना अटक ; एलसीबी पथकाची कार्यवाही….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
उमरखेड :
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीवरून उमरखेड तालुक्यातील विडुळ आणि परिसरात कार्यवाही करत आठ मोटर सायकल सह दोन आरोपी अटक करण्यात पोलिस प्रशासनाला मोठे यश प्राप्त झाले आरोपीकडून अजूनही चोरीच्या गुन्ह्यातील मोटरसायकल मिळण्याची शक्यता आहे ही कार्यवाही काल 23 जून रोजी करण्यात आली.
पोलीस अधीक्षक डॉ. दिलीप भुजबळ, अपर पोलीस अधीक्षक धरणे साहेब यांचे मार्गदर्शनखाली पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मिळालेल्या माहीती वरून वीडूळ येथील आरोपी रितेश महेंद्र तिवारी वय 19 वर्ष आणि हिमायतनगर येथील सय्यद इरफान सय्यद फयाझ यास ताब्यात घेऊन त्यांचे कडुन चोरी केलेल्या आठ मोटर सायकल अंदाजे किंमत दोन लाख पन्नास हजार रुपयेच्या जप्त केल्या असुन आरोपीना अटक करून पोलीस स्टेशन उमरखेड मध्ये त्यांच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आरोपीवर हिमायतनगर बिटरगाव पुसद वसंत नगर येथे गुन्हा दाखल असून आरोपी कडुन अजुन चोरीच्या मोटर सायकल मिळण्याची शक्यता आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक डॉक्टर दिलीप भुजबळ व अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर खंडेराव धरणे , पोलीस निरीक्षक प्रदीप परदेशी ठाणे गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक भगवान पायघन, योगेश रंधे, नाईक पोलीस कॉन्स्टेबल पंकज पातुरकर, उमेश पिसाळकर, सुधीर पिदुरकर, पोलीस कॉन्स्टेबल मोहम्मद ताज, किशोर झेंडेकर, शहेजाद, यशवंत जाधव यांनी कारवाई केली

सुप्रिया सुळे प्रशांत जगतापांच्या नाराजीवर स्पष्टच बोलल्या; म्हणाल्या, ‘समाजात काम करताना नाराजी…’
गड्डमवार यांनी घडलेली विकास व कृषी क्रांती आजही प्रेरणादायी; आ. विजय वडेट्टीवार यांचे प्रतिपादन….
मंत्री नितेश राणेंसह दोन आमदारांविरुद्ध अटक वॉरंट जारी; न्यायालयाचा नेतेमंडळींना दणका….
एकीकडे ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा, दुसरीकडे फडणवीस सरकारचे चार महत्त्वाचे निर्णय समोर…..
काँग्रेसचा बुलंद आवाज हरपला ; महाराष्ट्राच्या माजी वनमंत्र्यांचे उपचारादरम्यान निधन….
जागावाटप ते महापौरपद, ठाकरे बंधूंनी सर्वच सांगितलं, मनसे-ठाकरेंकडून अधिकृत युतीची घोषणा….