24 तासात 13 कोरोनामुक्त ; 15 पॉझेटिव्ह…
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
यवतमाळ, दि. 23 जून :-
गेल्या 24 तासात जिल्ह्यात 15 जण पॉझेटिव्ह तर 13 जण कोरोनामुक्त झाले आहे. जि.प. आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज एकूण 1080 जणांचे रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 15 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 1065 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 64 रुग्ण ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहेत. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 72671 झाली आहे तर बरे झालेल्यांची एकूण संख्या 70821 झाली आहे. जिल्ह्यात कोरोनामुळे एकूण 1786 मृत्युची नोंद आहे.
जिल्ह्यात आतापर्यत 6 लक्ष 76 हजार 05 चाचण्या झाल्या असून त्यापैकी 6 लक्ष 03 हजार 171 निगेटिव्ह आहेत. सद्यस्थितीत जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटी दर 10.75 असून दैनंदिन पॉझिटीव्हीटी दर 1.39 आहे तर मृत्युदर 2.46 आहे.
जीएमसी, डीसीएचसी व खाजगी रुग्णालयात 2233 बेड उपलब्ध
जिल्ह्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, 11 डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर आणि 34 खाजगी कोव्हीड हॉस्पीटलमध्ये एकूण बेडची संख्या 2279 आहे. यापैकी 46 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 2233 बेड उपलब्ध आहेत. यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात एकूण 577 बेडपैकी 26 बेड रुग्णांसाठी उपयोगात असून 551 बेड शिल्लक, 11 डीसीएचसीमध्ये एकूण 526 बेडपैकी 17 रुग्णांसाठी उपयोगात तर 509 बेड शिल्लक आणि 34 खाजगी कोव्हीड रुग्णालयात एकूण 1176 बेडपैकी 3 उपयोगात तर 1173 बेड शिल्लक आहे…

पुसद प्रशासनाने अतिक्रमन हटविताना फळ व भाजी तसेच किरकोळ विक्रेत्यांना पर्यायी व्यवस्था त्वरित द्यावी :- महाविकास आघाडी…
रायगडच्या आंबेनळी घाटात भीषण अपघात, स्कॉर्पिओ दरीत कोसळली, आठ जणांचा मृत्यू….
देशातील पहिला ‘पाण्याचा सातबारा’ महाराष्ट्रात, महसूलमंत्री बावनकुळेंचा मोठा निर्णय, पाण्याचं तीन टप्प्यात होणार ऑडिट….
“कॉक्रोच जनता पार्टीच्या विषयाला इतके भावूक होऊन पाहू नका..!” ; सीजेपी मोहिमेविरोधातील याचिकेवर सरन्यायाधीश सूर्यकांत यांचे भाष्य, म्हणाले, योग्य वेळी….
गेल्या 12 वर्षात देशात काय विकास झाला..? फडणवीसांनी सांगितलं ; म्हणाले यूपीएच्या काळात….
संपकर्त्या सरकारी कर्मचार्यांचा चार दिवसांचा पगार कापणार नाही; शिक्षक, शिक्षकेतर, निमशासकीय कर्मचार्यांनाही लागू…