हिवरा येथील पुस नदीच्या पुलावर पडलेले खड्डे बुजवा ; राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचा निवेदनाद्वारे आंदोलनाचा ईशारा
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
रियाज पारेख
महागाव:-
पुस नदीच्या पुलावर खड्डे पडल्याने वाहन धारकांना वाहन चालविताना जिव मुठीत घेवुन प्रवास करावा लागत आहे या खड्डयामुळे अनेक अपघात घडले असल्याने या पुलावरील खड्डे ताबडतोब बुजविण्यात यावे अन्यथा आंदोलन करण्याचा ईशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसने दिला आहे.
महागाव तालुक्यातील हिवरा(संगम)ते टेंभी रस्त्यावर पुसनदिवर हिवरा येथे असलेल्या पुलावर मोठमोठे खड्डे पडले आहेत त्यामुळे अनेक छोटेमोठे अपघात घडले सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नाही परंतु हे खड्डे बुजविले नाही तर भविष्यात या खड्ड्यांमुळे एखाद्याला आपला जीव गमवावा लागण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने याकडे लक्ष देवुन या पुलावरील खड्डे ताबडतोब बुजविण्यात यावे अन्यथा नागरिकांच्या जिवित्वासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या वतीने तीव्र जनआंदोलन छेडण्याचा ईशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाउपाध्यक्ष सौरभ पाटील कदम,तालुकाध्यक्ष दिपक पाटील कदम,गजेंद्र जामकर,प्रतिक नरवाडे, प्रज्वल ठाकरे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे महागाव उपअभियंता यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.
हिवरा ते टेंभी या मार्गावर वाहनांची मोठी गर्दी असते परंतु पुस नदीवरील अरूंद पुलामुळे समोरासमोर येणाऱ्या वाहने,बैलगाडी यांना मोठा त्रास सहन करावा लागत असुन वाहनधारकांसह पादचाऱ्यांना या पुलावरून चालतांना जिव मुठीत घेवुन मार्गक्रमण करावे लागत आहे त्यामुळे या पुलाची रूंदी वाढविण्याची गरज असुन सार्वजनिक बांधकाम विभागाने या पुलाची रूंदी वाढविण्यासाठी प्रयत्न करून नागरिकांची या मरण या नेतुन सुटका करावी.
पुस नदीवरील पुलावर खड्डे पडल्याने अनेक वेळा अपघात घडुन वाहनधारकांना किरकोळ दुखापती झाल्या सुदैवाने यात जिवीत हानी झाली नाही. बांधकाम विभागाला अनेक वेळा खड्डे बुजविण्यात यावे यासाठी माहिती दिली परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग याकडे दुर्लक्ष करीत आहेत भविष्यात या खड्ड्यांमुळे जिवीत हानी झाल्यास त्याला सर्वस्वी सार्वजनिक बांधकाम विभागच जबाबदार राहणार आहे.येत्या आठ दिवसात बांधकाम विभागाने या रस्त्यावरील खड्डे न बुजविल्या राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस जनहितासाठी आंदोलन करेल.
:- सौरभ पाटील कदम(जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस यवतमाळ)

गोवंश तस्करांनी केली बजरंग दल कार्यकर्त्याची दगडांनी ठेचून निर्घृण हत्या ; सुकळी गावात मध्यरात्री घडला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार…
लडाखमध्ये लष्कराचे ‘चीता’ हेलिकॉप्टर डोंगराला धडकले, मेजर जनरल थोडक्यात बचावले; दोन्ही पायलट जखमी….
कॉकरोच जनता पार्टीवर कारवाई; एक्स, इन्स्टानंतर वेबसाईटवरही बंदी…
पेट्रोल-डिझेलच्या किमतीत पुन्हा वाढ, चेक करा नवे दर…
दहावी पास विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी, बोर्डाने घेतला मोठा निर्णय…
उद्धव ठाकरेंनी फसवलं..? बच्चू कडू यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…