फ्रंटलाईन वर्कर चा दर्जा देण्यासाठी विज कामगार,अभियंते-अधिकारी,कंत्राटी कर्मचार्यांचे काम बंद आंदोलन….
पॉलिटिक्स स्पेशल लाईव्ह
दारव्हा :- राज्यातील विज कर्मचारी,अभियंते-अधिकारी,कंत्राटी कर्मचारी यांच्या संयुक्त कृती समिती तर्फे दि.२४/०५/२०२१
पासून विविध मुद्यांनवर संपूर्ण महाराष्ट्रात काम-बंद आंदोलन चालू असून आज तिसऱ्या दिवशी सुद्धा दारव्हा तालूक्यातील विज कंपन्यांतील संयुक्त कृती समिती तर्फे काम-बंद आंदोलन चालू होते.काम-बंद आंदोलनामध्ये विज कंपन्यांतील संयुक्त कृती समिती तर्फे प्रमुख मागण्या विज कर्मचारी,अभियंते-अधिकारी,कंत्राटी कामगार व सुरक्षा रक्षक यांना फ्रंटलाईन कामगाराचा दर्जा देवून राज्य शासनाप्रमाणे फ्रंटलाईन वर्कर च्या सर्व सुविधा द्या,विज कंपन्यांतील सर्व कर्मचारी,अभियंते-अधिकारी,कंत्राटी कामगार,सर्व सहाय्यक व सुरक्षा रक्षक यांचे व त्यांच्या परिवारातील सर्व सदस्यांचे प्राधान्याने लसीकरण करावे,कोरोणा विषाणू मुळे मृत पावलेल्या विज कर्मचारी,अभियंते-अधिकारी,कंत्राटी कामगार व सर्व सहाय्यक यांना राज्य शासनाप्रमाणे रु ५० लाख अनुदान देणे,सर्वात महत्वाचे म्हणजे मेडीक्लेम पाँलीसी मधील बदलविलेले टिपीए तत्काळ रद्द करुन जुने टिपीए एम डी ईंडीया ची ताबडतोब नेमणूक करणे,कोरोणा विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता विज कर्मचार्यांना विज बिल वसुली करीता सक्ती करु नये या प्रमुख मागण्याकरीता विज कर्मचारी,अभियंते-अधिकारी यांचे दि.२४/०५/२०२१ पासून मागण्या मान्य होईपर्यंत बेमुदत काम-बंद आंदोलन पुकारले आहे.परंतु या काम-बंद आंदोलनाचा कोवीड सेंटर,क्वारंटाईन सेंटर अथवा कोरोणा पेशंट ला व ईतर कुठल्याच अत्यावश्यक सेवेला फटका बसणार नाही याची सुद्धा विज कर्मचारी,अभियंते-अधिकारी यांनी विशेष खबरदारी घेतली आहे.काम-बंद आंदोलनामध्ये संयुक्त कृती समितीतील वर्कर्स फेडरेशन संघटनेतर्फे विभागीय अध्यक्ष सुधिर राठोड,शाखा सचिव अक्षय आरु इतर कर्मचारी चंद्रकांत धार्मिक,संतोष मंदाडे,मिलींद सावंत,घनश्याम खोपडकर,नितीन राठोड,नरेश तिराणकर,महीला कर्मचारी प्रणीता वाकडे,कंत्राटी कामगार प्रणित शिरे,सुरक्षा रक्षक उमेश भगत यांनी काळ्या फिती लावून शासनाचा निषेध नोंदविला.

“जमीनचोर निघाला मुरलीधर”, मित्रपक्षांचा खासदार मोहोळांविरोधात शड्डू? धंगेकरांची सूचक पोस्ट….
निवडणूक आयोगावर राज ठाकरेंचा ‘बोगस’ बॉम्ब..! ‘मतदार यादीत ९६ लाख खोटे मतदार घुसवल्याचा आरोप….
बीडमधील ओबीसी मेळाव्यात छगन भुजबळ अन् धनंजय मुंडेंचं आक्रमक भाषण ; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया….
जीआरचा फुगा फुटतोय, मराठा समाजाचा उद्रेक पुन्हा होतोय..! विखे पाटलांना घेराव….
२४ वर्षांनी बाळा नांदगावकर शिवसेना भवनात, बाळासाहेब ठाकरेंच्या आठवणींत अश्रू अनावर, म्हणाले; “लवकरच.”
९ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर बंजारा समाजाचा विशाल मोर्चा ; निरंजन नाईक होणार सहभागी….