अंन्तोदय,राशन कार्ड आणि शेतकरी लाभार्थ्यांनी अन्नधान्याचा लाभ घ्यावा :महागाव तालुका प्रशासनाचे आवाहन
पॉलिटिक्स स्पेशल लाइव्ह
रियाज पारेख : ९६३७८८६ ७७७
महागाव :
सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत अन्न धान्याचा लाभ घेत असलेल्या लाभर्थ्यांसाठी मे महिन्याचे धान्य तालुका पुरवठा प्रशासनाला प्राप्त झाले आहे. योजने निहाय मोफत असलेले आणि कमी दराने वाटप होणारे अन्नधाधान्याचे परिमाण निश्चित करण्यात आले असून त्यानुसार लाभार्थ्यांना अन्नधान्य वितरित करण्यात येणार आहे. लाभार्थ्यांनी योजनेनुसार अन्नधान्याचा लाभ घेण्याचे आवाहन तालुका प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
अंत्योदय अन्न योजने अंतर्गत गहु प्रति कार्ड १६ किलो,तांदूळ प्रति कार्ड १९ किलो मोफत ,साखर प्रति कार्ड १ किलो २० रुपये प्रति कार्ड दराने, प्राधान्य कुटुंब लाभार्थी गहु प्रति व्यक्ति ३ किलो,तांदूळ प्रति व्यक्ति २ किलो मोफत,देण्यात येणार आहे.शेतकरी लाभार्थी योजने अंतर्गत गहु प्रति व्यक्ति ३ किलो २ रुपये प्रति किलो दराने तर तांदूळ प्रति व्यक्ति २ किलो ३ रुपये प्रति किलो दराने वाटप करण्यात येत असून प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना तथा अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभर्थ्यांना योजनेकरिता गहु प्रति व्यक्ति ३ किलो आणि तांदूळ प्रति व्यक्ति २ किलो मोफत वाटप करण्याचे परिणाम निश्चित करण्यात आले आहे.
कोरोना जन्य परिस्थिती असल्याने लाभार्थ्यांनी अन्नधान्याचा माल घेताना त्रिसूत्री नियमाचे काटेकोर पालन करावे असे आवाहन नामदेव इसळकर ,नायब तहसीलदार डॉ.संतोष अदमुलवाड, यांनी केले आहे .

शिंदेंनी दिलेली विधान परिषदेची ऑफर स्वीकारणार की नाही..? बच्चू कडूंचं सूचक विधान….
शिवसेनेत विलिनीकरणाच्या चर्चेसाठी बच्चू कडू तयार, पण ठेवली ‘ही’ अट ; पत्रकार परिषदेत मांडली भूमिका..!
उद्धव ठाकरे विधान परिषद निवडणूक लढणार नाहीत; ‘या’ निष्ठावंताला दिली संधी….
राज्याचं AI धोरण जाहीर, दीड लाख रोजगार निर्मिती होणार, कॅबिनेट बैठकीत ७ मोठे निर्णय….
राज्यात उष्णतेच्या लाटेचा कहर..! उष्म्याने नागरिक हैराण; दहा दिवसांमध्ये 15 जणांचा मृत्यू….
राणेंच्या लेकानं पराभव केलेल्या माजी आमदाराला लाॅटरी, भाजपकडून विधान परिषदेवर संधी ; कोकणात कार्यकर्त्यांचा जल्लोष…..